यवतमाळ सामाजिक

जोडमोहा येथे शेतकरीपुत्र यांनी दिले महाराष्ट्र बंद ला समर्थन

उपसंपादक पवन धोत्रे

जोडमोहा येथे शेतकरीपुत्र यांनी दिले महाराष्ट्र बंद ला समर्थन

शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ महाराष्ट्र बंद

आज दि.११ ऑक्टोबर ला जोडमोहा येथे सर्व पक्षीय व गावकरी याच्या वतीने निषेध मोर्चाचे आयोजन केले होते.केंद्रीय गृहराज्य मंत्री यांचा मुलगा आशिष मिश्रा यांनी लखीमपूर खेरी (उत्तरप्रदेश) येथे केंद्रीय कृषि कायद्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना चार चाकी वाहनाद्वारे चिरडल्याने शेतकरी बांधवांचा मृत्यू झाला.त्यामुळे सदर आरोपींवर कठोर कार्यवाही करण्यात यावी याकरिता जोडमोहा येथे गावकरी तर्फे निषेध मोर्चा काढून आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. व जय जवान जय किसन नारे देत मोर्चा काढला दि.०३/१०/२०२१ रोजी लखीमपूर खेरी (उत्तरप्रदेश) येथे केंद्रीय कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर देशाचे केंद्रीय गृहराज्यमंत्री यांचा मुलगा आशिष मिश्रा व त्यांचे सहकारी यांने शेतकरी आंदोलकांना चार चाकी वाहनाद्वारे चिरडल्याने काही शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला तर काही शेतकरी गंभीर जखमी आहे. सदर शेतकऱ्यांसोबत घडलेली घटना ही शेतकऱ्यांबद्दल असलेली क्रूरता दर्शविते. शेतकऱ्यांना चार चाकी वाहनाद्वारे चिरडणाऱ्या आरोपींना अजून पर्यंत उत्तरप्रदेश प्रशासनाने अटक करून कार्यवाही केलीली नाही.परंतु शेतकरी आंदोलकांची पाहणी करण्याकरिता गेलेल्या काँग्रेस च्या नेत्या प्रियंका गांधी यांना उत्तरप्रदेश प्रशासनाने अटक केली व आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना भेटण्याकरिता प्रशासनाने जाऊ दिले नाही.
केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांनी लखीमपूर खेरी येथे घडलेली हिंसक घटना असून त्या घटनेला खत पाणी देऊन घटना घडवून आणलेली असून आपल्या मुलाला व त्यांच्या सहकाऱ्यांना वाचविण्याकरिता सर्व उत्तरप्रदेश प्रशासन कामी लावलेले आहे.त्यामुळे त्यांना पदावर ठेवण्याचा व राहण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही.त्याकरिता त्यांना तात्काळ केंद्रीय मंत्रिमंडळातुन काढून टाकण्यात यावे व त्यांचा मुलगा आशिष मिश्रा व त्यांचे सहकारी यांच्यावर कठोर कायदेशीर कार्यवाही करून अटक करण्यात यावी व शेतकरी आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा.
सदर घटनेच्या निषेधार्थ जोडमोहा येथे सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी बांधव यांच्या कडून सदर घटनेचा निषेध व्यक्त केले यावेळी उपसभापती विलास राठोड,विजय लिहारे,प्रशांत भोयर, बंडुभाऊ वाघाडे, पवन जाधव,प्रवीण ढाकुलकर,भास्कर पवार,गोपाल शर्मा, वासुदेव कटारे,किसन लिल्हारे,संजय आडे,ओम कटारे, निखिल बोन्द्रे,नारायण राठेड,प्रभाकर पडघन, मुकेश लिल्हारे,गणेश राजूरकर,भाऊशिंग आडे युवराज आडे,उमेश टेकाम,डिगांबर बाबरीया,नरेंद्र राठोड,जगदीश लिल्हारे, सर्व सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी बांधव उपस्थित होते.

Copyright ©