महाराष्ट्र राजकीय सामाजिक

वडनेर येथे महाविकास आघाडी च्या वतीने निषेध मोर्चाचे आयोजन

आजनसरा प्रतिनिधी डॉ.संदीप लोंढे

वडनेर येथे महाविकास आघाडी च्या वतीने निषेध मोर्चाचे आयोजन

आज दि.११ ऑक्टोबर २०२१
ला वडनेर येथे महाविकास आघाडी च्या वतीने निषेध मोर्चाचे आयोजन केले होते.केंद्रीय गृहराज्य मंत्री यांचा मुलगा आशिष मिश्रा यांनी लखीमपूर खेरी (उत्तरप्रदेश) येथे केंद्रीय कृषि कायद्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना चार चाकी वाहनाद्वारे चिरडल्याने शेतकरी बांधवांचा मृत्यू झाला.त्यामुळे सदर आरोपींवर कठोर कार्यवाही करण्यात यावी याकरिता वडनेर येथे महाविकास आघाडी तर्फे निषेध मोर्चा काढून आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
दि.०३/१०/२०२१ रोजी लखीमपूर खेरी (उत्तरप्रदेश) येथे केंद्रीय कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर देशाचे केंद्रीय गृहराज्यमंत्री यांचा मुलगा आशिष मिश्रा व त्यांचे सहकारी यांने शेतकरी आंदोलकांना चार चाकी वाहनाद्वारे चिरडल्याने काही शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला तर काही शेतकरी गंभीर जखमी आहे. सदर शेतकऱ्यांसोबत घडलेली घटना ही शेतकऱ्यांबद्दल असलेली क्रूरता दर्शविते.तसेच लखीमपूर खेरी येथे शेतकरी आंदोलकांवर झालेल्या अन्यायाची पाहणी करण्याकरिता गेलेल्या काँग्रेस च्या नेत्या प्रियंका गांधी यांना उत्तरप्रदेश येथील प्रशासनाने त्यांना धक्का बुक्की करून त्यांना अटक केली मात्र आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना चार चाकी वाहनाद्वारे चिरडणाऱ्या आरोपींना अजून पर्यंत उत्तरप्रदेश प्रशासनाने अटक करून कार्यवाही केलीली नाही.परंतु शेतकरी आंदोलकांची पाहणी करण्याकरिता गेलेल्या काँग्रेस च्या नेत्या प्रियंका गांधी यांना उत्तरप्रदेश प्रशासनाने अटक केली व आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना भेटण्याकरिता प्रशासनाने जाऊ दिले नाही.
केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांनी लखीमपूर खेरी येथे घडलेली हिंसक घटना असून त्या घटनेला खत पाणी देऊन घटना घडवून आणलेली असून आपल्या मुलाला व त्यांच्या सहकाऱ्यांना वाचविण्याकरिता सर्व उत्तरप्रदेश प्रशासन कामी लावलेले आहे.त्यामुळे त्यांना पदावर ठेवण्याचा व राहण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही.त्याकरिता त्यांना तात्काळ केंद्रीय मंत्रिमंडळातुन काढून टाकण्यात यावे व त्यांचा मुलगा आशिष मिश्रा व त्यांचे सहकारी यांच्यावर कठोर कायदेशीर कार्यवाही करून अटक करण्यात यावी व शेतकरी आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा.
सदर घटनेच्या निषेधार्थ वडनेर येथे महाविकास आघाडी चे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी बांधव यांच्या कडून सदर घटनेचा निषेध म्हणून वडनेर येथे मिरवणूक काढून बाजारपेठ १ दिवसाकरिता बंद ठेऊन पोलिस स्टेशन वडनेर येथे सदर घटनेच्या संदर्भात निवेदन देण्यात आले.निवेदन देतांना विनोद वानखेडे(अध्यक्ष-रा.कॉ.पा.हिंगणघाट तालुका),कविता विनोद वानखेडे(सरपंच ग्रा.पं. वडनेर),सुभाष शिंदे (उपसरपंच ग्रा.पं. वडनेर),राजेंद्र भोरे(उपाध्यक्ष-खरेदी विक्री महासंघ हिंगणघाट),पांडुरंगजी निंबाळकर,अजय ढोक (सदस्य-ग्रा.पं. वडनेर),हनीफ़खाँ पठान (अध्यक्ष-रा.कॉ.पा.अल्पसंख्याक सेल हिंगणघाट तालुका),राहुल भुते (अध्यक्ष-रा.कॉ.पा.ओ.बी.सी.सेल हिंगणघाट तालुका),विशाल दिवे (उपाध्यक्ष-राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी हिंगणघाट तालुका),मंगेश भोयर(शाखाप्रमुख युवासेना वडनेर),दशरथ दुर्गे(माजी उपसरपंच), सौ.दीपाली भुते(सदस्य-ग्रा.पं.वडनेर),सौ.वर्षा भोयर(सदस्य-ग्रा.पं.वडनेर),आरिफ शेख(सदस्य-ग्रा.पं.वडनेर),चंदू ब्राम्हणे,गजानन तागडे,शंकर सुरकार,पंडित कळसकर
मदन भगत,गणेश जैस्वाल,विनोद मांगरूटकर,अहमदखा पठाण,फिरोज शेख(अध्यक्ष तंटामुक्ती समिती वडनेर),एकनाथ उमाटे,सुरेशराव काळे,चांगले गुरुजी,प्रभाकरराव धात्रक,गजानन जारोंडे,सुनील मून,मोहन लोहकरे,निखिल कळसकर,बंटी कुंभारे,बंडूजी जारोंडे, हनुमानजी जारोंडे,शंकरराव गेडेकर, बाबाराव फाटे,वामणराव सुरकार,विजय इटनकर,अमित झाडे,हेमंत कामडी, खुशाल महाजन,तुषार दुर्गे, शुभम घोटेकर,अमोल कटारे,अशोक दिवे,पिंटू गेडाम,रामचंद्र शिंदे,श्याम शिंदे,सागर जौजाळ व वडनेर येथील महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते व शेतकरी बांधव उपस्थित होते.

Copyright ©