यवतमाळ सामाजिक

पारवा ठाणेदारांची अवैध दारू विरोधात धडक मोहीम. महिलांकडून आनंद वेक्त

सावळी सदोबा आशीफ खान

पारवा ठाणेदारांची अवैध दारू विरोधात धडक मोहीम.
महिलांकडून आनंद वेक्त

सावळी सदोबा येथे नुकतीच साई मंगल कार्यालया मध्ये पारवा ठाणेदार मा.श्री. विनोद चव्हाण व सावळी सदोबा परिसरातील महिलांची बैठक पार पडली .
या बैठकीमध्ये महिलांनी अवैध दारूचा मुद्दा पोटतिडकीने मांडला ठाणेदार विनोद चव्हाण यांनीही महिलांच्या अवैध दारू बंद करण्याच्या मागणीला प्रतिसाद दिल्याने परिसरात अवैध दारूचा व्यवसाय करणारे धास्तावून गेलेले आहे .
याबाबत सविस्तर वृत्त असे की पारवा पोलीस स्टेशनला नव्यानेच रुजू झालेले ठाणेदार श्री विनोद चव्हाण यांनी पारवा पोलीस स्टेशनचा प्रभार हाती घेताच अवैध धंद्या विरोधात व अवैध दारू विरोधात धाडसत्र सुरू केले.
त्यांनी नुकतीच सावळी सदोबा व परिसरातील जवळपास 30 गावांच्या महिलांची सावळी सदोबा येथील साई मंगल कार्यालयामध्ये एका बैठकीचे आयोजन केले होते .यात त्यांना श्री विलास राठोड (तालुका व्यवस्थापक -MSRLM -पंचायत समिति Arni ) श्री. संतोष जीरे (प्रभाग समन्वयकMSRLM सावळी जी.प.सर्कल )श्री. ज्ञानराज बैसकार(प्रभाग समन्वयक MSRLM जवळा जी.प.सर्कल )सौ.वनिता रामटेके (बँक सखी- BOM सावळी ) सौ.मंजिता शिंदे (आरोग्य सखी MSRLM सावळी जी.प. सर्कल ) प्रभागसंघ व ग्रामसंघ पदाधिकारी व सावळी प्रभागातील सर्व समूह साधन व्यक्ति यांचेही मोलाचे सहकार्य लाभल्याने बचत गटाच्या महिलाही मोठ्या संख्येने या बैठकीत उपस्थित होत्या.
अनेक महिलांनी गावागावात दारूपायी होणाऱ्या महिलांच्या त्रासाकडे ठाणेदार विनोद चव्हाण यांचे लक्ष वेधले , मागील काही महिन्यापासून सावळी सदोबा परिसरातील गावागावात दारूचा अक्षरशा महापूर वाहत होता. त्याला नव्यानेच आलेल्या ठाणेदार विनोद चव्हाण यांनी काही प्रमाणात अंकुश लावण्याचे काम केले .
पारवा पोलीस स्टेशनच्या निर्मितीपासून आजपावेतो कुन्याही ठाणेदाराने सावळी व परिसरातील महिलांसोबत अवैध धंद्यापायी महिलांना होणाऱ्या त्रासाबद्दल कधीच बैठक घेतली नाही किंवा त्यांच्याशी चर्चा केली नाही .
ठाणेदार विनोद चव्हाण यांनी सावळी सदोबा येथे परिसरातील महिलांची प्रथमच बैठक घेतल्याने अनेक महिलांनी ठाणेदार चव्हाण यांचे आभार मानले व त्यांचे कार्य करण्याच्या पद्धतीची प्रशंसाही केली.

Copyright ©