यवतमाळ सामाजिक

‘ शिक्षण पूर्ण करण्याचा सेकंड चान्स म्हणजे मुक्त विद्यापीठ ‘- कुलगुरू प्रो. वायुनंदन

माहूर प्रतिनिधी पद्मा गिऱ्हे 

‘ शिक्षण पूर्ण करण्याचा सेकंड चान्स म्हणजे मुक्त विद्यापीठ ‘- कुलगुरू प्रो. वायुनंदन

‘मुक्त विद्यापीठाचे शिक्षण म्हणजे अपूर्ण शिक्षण पूर्ण करण्यासाठी मिळालेला सेकंड ऑप्शन नसून सेकंड चान्स आहे ‘ असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकचे कुलगुरू प्रो. ई. वायुनंदन यांनी दि. ०९ ऑक्टोबर रोजी केले. ते बळीराम पाटील मिशन मांडवी संचलित श्री रेणुकादेवी कला वाणिज्य व विज्ञान अभ्यासकेंद्रास सदिच्छा भेट व पाहणी दरम्यान व्यक्त केले.
याप्रसंगी व्यासपीठावर नाशिक विद्यापीठाचे विद्यार्थी सेवा विभागाचे संचालक डॉ. प्रकाश देशमुख, वित्त अधिकारी डॉ. चंद्रकांत पवार, नांदेड विभागाचे विभागीय संचालक डॉ. बी.के.मोहन, संस्थेचे उपाध्यक्ष किशोर जगत, किनवट शिक्षण संस्थेचे सचिव शंकरराव चाडावार, संचालक नारायण सिडाम, बळीराम पाटील महाविद्यालय किनवटचे प्राचार्य डॉ. एस. के. बेंबरेकर यांची उपस्थिती होती.
अध्यक्षीय समारोपातून प्रफुल्ल राठोड यांनी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी पूर्ण करण्याची संधी माहूर मध्ये उपलब्ध करून दिल्याबद्दल विद्यापीठ प्रशासनाचे आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. एन.जे.एम. रेड्डी यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपप्राचार्य
डॉ. राजेंद्र लोणे यांनी केले शेवटी उपस्थितांचे आभार डॉ. धरमसिंग जाधव यांनी व्यक्त केले. अभ्यासकेंद्राचे संयोजक बाबासाहेब राठोड यांनी अथक परिश्रम घेतले.

Copyright ©