महाराष्ट्र सामाजिक

भोजाजी महाराजांचे मंदिर भक्तांसाठी खुले

अजनसरा प्रतिनिधी डॉ संदिप लोंढे 

देवाचे द्वार उघडले
—————————————-
भोजाजी महाराजांचे मंदिर भक्तांसाठी खुले
————————————-
कोरोना नियमांचे पालन करण्याचे संस्थान कडून आवाहन
————————————–
कोरोनाचा विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य शासनाकडून मंदिरासह धार्मिक स्थळे खुली करण्याचा निर्णय घेन्यात आला आहे, त्यामुळे शासनाने निर्देशित केलेले उपाय व मार्गदर्शक सूचनांचे पालन करून आज 7 ऑक्टोंबर पासून संत भोजाजी महाराजांचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे,शासनाच्या सूचनेनुसार महाद्वारासमोर वाहनांची व येणाऱ्या भाविकभक्तांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवता यावे म्हणून समाधी दर्शनासाठी भक्तनिवास मुख्य मार्ग खुला करण्यात आला असून दर्शन रांगेतील भाविक भक्तांसाठी सभागृहातुन कोरोना नियमांचे पालन करून सावकाश व सुरक्षित दर्शन व्हावे या साठी उपाय योजना करण्यात आल्या आहे,आजपासून मंदिर सुरू झाल्यामुळे गेल्या दीड वर्षापासून बंद असलेल्या प्रासादिक वस्तूंच्या विक्रीतून मोठ्या उलढलाची सुरुवात होणार असल्याने संबंधित व्यावसायिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे, हार ,फुले विक्रीवर अवलंबून असणाऱ्या सर्व सामान्य नागरिकांच्या अर्थकारणाला आत्ता वेग येणार आहे,
आज सकाळी पासूनच महाराजांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी वाढत होती परंतु शासनाच्या आदेशानुसार संत भोजाजी महाराज संस्थान कडून निर्गमित करण्यात आलेल्या नियमावलीचे काटेकोर पालन करून, सर्वसामान्य भाविकांसाठी समाधी दर्शन सुरू करण्यात आले, आजनसरा हे तीर्थक्षेत्र भोजाजी महाराजांजवळ करण्यात येणाऱ्या पूरन पोळी स्वयंपाकासाठी प्रसिद्ध असून सम्पूर्ण विदर्भातून भाविक भक्त या ठिकाणी येत असतात त्यामुळे सध्या संस्थान कडून प्रकाशित करण्यात आलेल्या नियमावली नुसार नोंदणी केलेल्या 50 पुरणपोळी स्वयंपाकाला परवानगी असणार आहे,तसेच प्रत्येक स्वयांपकावर 50 निमंत्रिकांना प्रवेश राहणार आहे,स्वयंपाक घेऊन येणाऱ्या भाविकांना 15 दिवस आधी नोंदणी करणे गरजेचे असल्याचे संत भोजाजी महाराज देवस्थान चे अध्यक्ष डॉ.विजय पर्बत यांनी सांगितले

Copyright ©