Breaking News महाराष्ट्र यवतमाळ

असह्य वेदनांचा झाला अखेर शेवट आजनसराच्या दिव्यांग रितेशचे निधन

आजनसरा प्रतिनिधी डॉ संदीप लोंढे

असह्य वेदनांचा झाला अखेर शेवट आजनसराच्या दिव्यांग रितेशचे निधन

या जगण्यावर ,या जन्मावर शतदा प्रेम करावे.असे कवीने जीवनाचे सुंदर वर्णन केले आहे.जीवन जगत असताना अनेक अडीअडचणीचा सामना करावा लागतो,अशाच प्रकारे आजणसरा येथील रितेश दिलीप चौधरी वय 20 वर्ष या दिव्यांग्य असलेल्या युवकाची कहाणी आहे, आज तो अल्पशा आजाराने
सेवाग्राम रुग्णालयात उपचार सुरू असताना जग सोडून निघून गेला, जन्मतःच असलेल्या दिव्यांगामुळे अनेक संकटावर मात करीत जीवनाची वीस वर्षे आयुष्य जगला, घरची आर्थिक परिस्थिती अत्यन्त हालाकीची
घरी आई वडील व १ भाऊ व १ बहीण असून त्याचे आई वडील मोल मजुरी करून पोट भरतात आणि आपले कुटुंब चालवतात, त्यांच्याकडे फक्त दोन एकर शेत असून त्या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारचे पोट भरण्याचे साधन नसल्यामुळे मोलमजुरी केल्याशिवाय पर्याय नाही उन वारा पाऊस याची तमा न बाळगता रितेश च्या उपचारासाठी ते जीवन जगत होते घरची परिस्थिती अत्यंत बिकट असून, राहायला झोपडी सदृश घर रितेश चौधरी हा १०० टक्के अपंग असल्याने त्याला दोन्ही पायांनी चालता येत नव्हते त्यामुळे आंघोळ जेवण सारख्या सर्व गोष्टी आई कल्पना चौधरी यांना करुण द्याव्या लागत होत्या त्यामुळे शिक्षनाची आवड़ असून सुद्धा तो क्षिक्षण घेऊ शकला नाही, आयुष्यात त्याला भरपूर काही करायचे होते परंतु 100 टकके असलेल्या दिव्यागा मुळे त्याचे स्वपन्न मात्र पूर्ण होऊ शकले नाही, .त्याला जिवंत राहन्यासाठीच अनेक गोष्टी चा सामना करावा लागला, तरी खंबीरपणे अनेक समस्यांवर मात करून आयुष्य जगला
परंतु नियतीला रितेशचे दिर्घआयुषी होणे मान्य नसल्याने
काल सेवाग्राम रुग्णालयात उपचारादरम्यान रितेशचे निधन झाले त्याच्या मागे आई वडील भाऊ बहीण असा परिवार आहे.

Copyright ©