Breaking News यवतमाळ सामाजिक

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार एक ठार तर दुसरा गंभीर,मृतकास 6 की.मी.नेले फरफटत

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार एक ठार तर दुसरा गंभीर,मृतकास 6 की.मी.नेले फरफटत

यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या हिवरी तलावा जवळ माघावून येणाऱ्या ट्रक क्रं. एम. एच.४४, यु,८०८० ने दुचाकी ला धडक दिल्याने एक डाव्या बाजूला पडला त्याला जबर मार लागला तर दुसरा नामे सय्यद मतीन सय्यद हमजा वय ३२ रा. कल्गाव डेहनी येथील रहिवाशी असल्याचे कळाले, हा ट्रक च्या मधात पडल्याने तो ट्रक च्या सिलेंडर च्या मधात फसला ट्रक चालकांनी न थांबता ट्रक घेऊन पळ काढला मुर्तक वेक्तीस जवळपास ६ किलो मिटर फरफटत आणले हि बाब माघाऊन येणाऱ्या वाहनाने ट्रक चालकाच्या निदर्शनास आणून दिली की ट्रक मध्ये काहीतरी अडकल चालकांनी ट्रक थांबून पहानी केली असता अपघात झालेला इसम फसल्याचे निदर्शनास येताच चालक आणि कीलीनर ट्रक सोडून पसार झाले या घटनेची माहिती मिळताच यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन ठाणेदार आपल्या ताफ्यासह घटना स्थळी दाखल झाले तर्तत्पूर्वी ग्रामीणचे संजय राठोड यांनी जमाव नियत्रणात आणला तर जखमीचे नाव मात्र कळू शकले नाही मृतकाच्या मागे दोन मुलं पत्नी मोठा आप्त परिवार आहे, तर या प्रकरणी पोलीस ट्रक चालकाचा शोध घेत आहे

Copyright ©