यवतमाळ सामाजिक

सहकार तज्ञ धनंजय तांबेकर

सहकार तज्ञ धनंजय तांबेकर

कोणतेही काम लहान अथवा मोठे नसते ते करीत असणारा व्यक्ती त्यामध्ये किती जीवओतून काम करतो त्यावर कामाची गुणवत्ता ठरत असते, आणि जी व्यक्ती आपल्या हातावरचे काम अगदी चोखपणे पूर्णत्वास नेत असते अशा व्यक्तिमत्वाच्या पुढे नविन कामाची संधी निर्माण होते.गोदावरी अर्बनचे व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर सर हे देखील असेच असामान्य व्यक्तिमत्त्व आहेत त्यांनी शिक्षणासोबतच “मार्शल आर्ट” या क्षेत्रात रा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर असंख्य पारितोषिके प्राप्त केले आहेत. दहा हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण दिले. त्यासोबतच विविध स्पर्धेत त्यांनी मुख्य प्रशिक्षक म्हणून देखिल कार्य केले आहे. म्हणतात प्रतिभावंत व्यक्ती आपले उचित ध्येय साध्य झाल्याशिवाय स्वस्थ बसत नाहीत. असाच प्रवास धनंजय तांबेकर सारंचा आहे.
बँकेतील सामान्य पदापासून ते व्यवस्थापकीय संचालक पदापर्यंत, बॅकिंग मधला ‘ब’ माहीत नसतांना आज सहकार क्षेत्रातील तज्ञ म्हणून नावलौकिक मिळवण्यापर्यंतचा संघर्षमय प्रवास त्यांनी गेली २८ वर्षांच्या कालावधीत पूर्ण केला आहे. प्रत्येक गोष्ट समजून घेऊन शिकण्याची प्रवृत्ती असल्यामुळे त्यांना एकाच वेळी सर्व विभागाचे कामकाज अवगत केले. त्यामुळे त्यांचा स्वभाव वरिष्ठांना आवडला अवघ्या काही महिन्यांत त्यांची पदोन्नती झाली. प्रचंड शिकण्याची तयारीमुळे यानंतर त्यांनी आयुष्यात कधीच वळून पाहिलं नाही दिवसागणिक यशाच्या पायऱ्या चालत यशोशिखरावर गेले.
गोदावरी अर्बनचे संस्थापक खासदार हेमंतभाऊ पाटील व अध्यक्ष राजश्रीताई पाटील यांनी गोदावरी अर्बनची स्थापना सामान्य माणसांची पत निर्माण व्हावी, त्यांना योग्य सन्मान मिळावा, त्यांना स्वतःच्या पायावर उभं करता यावं या उद्देशाने केली. आपला उद्देश सफल करण्यासाठी त्यांनी धनंजय तांबेकर सरांची व्यवस्थापकीय संचालक पदावर निवड केली. संस्थेच्या कामकाज अध्यक्ष राजश्रीताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तर धनंजय तांबेकर सर यांच्या नियोजनखाली सुरु असते. संस्थेने अल्पावधीतच सहकार क्षेत्रातील अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. नुकताच संस्थेने १४५० कोटींचा ठेवीचा पल्ला गाठला आहे. सहकार क्षेत्रातील नामवंत अनेक पुरस्कार गोदावरी अर्बनच्या शिरपेचात लावले आहेत त्यामध्ये प्रामुख्याने सलग ५ वेळा बँको, सहकार सुगंध, नॅशनल अवार्ड, अर्थरत्न, दीपस्तंभ, प्रतिबिंब, प्राईड ऑफ महाराष्ट्रा असे नामवंत पुरस्कार संस्थेला आपल्या कार्यशैलीमुळे अल्पावधीतच मिळाले आहे. नुकताच गोदावरी अर्बन अल्पावधीतच सहकार क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी केल्याची दखल सहकार भारतीने घेत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर सरांचा केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला आहे.
धनंजय तांबेकर सर अहोरात्र आपले काम करीत असतात. संस्थेच्या शाखेचा डे एन्ड ५ पर्यत, मुख्यालय ७ पर्यत तर तांबेकर सरांच डे एन्ड रात्री २ ते ३ च्या दरम्यान होत असतो. संस्थेतील दैनंदिन विविध १९ प्रकारचे सर्व रिपोर्ट पाहून त्यामध्ये कालच्या पेक्षा आज काय तफावत आहे. संस्थेच्या हिताची आहे की नाही या बाबी बारकाईने निरीक्षण करीत असतात सर्व झाल्यानंतरच अंतिम रिपोर्ट संस्थापक खासदार हेमंतभाऊ पाटील, अध्यक्ष राजश्रीताई पाटील यांना पाठविल्यानंतर त्यांचा डे एन्ड होत असतो. विशेष बाब म्हणजे सुट्टी वगळता या कामकाजात एकही दिवस खंड पडत नाही. धनंजय तांबेकर सर हे सहकार क्षेत्रात गेली २८ वर्षांपासून कार्यरत असून ते ‘’बँकिंग तज्ञ’’ आहेत त्याच बरोबर राज्य व सहकार फेडरेशन सारख्या नामवंत प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून हजारो युवकांना बँकिंगचे मागर्दशन करीत असतात सरांच्या सूक्ष्म नियोजनानुसार अंत्यत पारदर्शक व्यवहार गोदावरी अर्बन करीत आहे. “गोदावरी अर्बन” ने अल्पावधीतच सहकार क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या उत्कृष्ट कार्याबद्दल राज्य फेडरेशनचा ”सहकार शक्ती पुरस्कार” त्यांना प्राप्त झाला आहे.
गोदावरी अरबनचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलंगाणा, कर्नाटक व गुजरात या पाचही राज्यात “गोदावरी अर्बन” च्या सर्व शाखा नामांकित बँकांना देखिल लाजवतील इतक्या सुसज्ज देखण्या आणि संगणकीकृत आहेत. बँकिंग करतांना संस्था आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत ग्राहकांना आर.टी.जी.एस., एन.एफ.टी., मोबाईल बँकिंग, कोअर बॅकिंग अशा सेवा देत आहे. संस्थेची कर्मचारी भरती ही अत्यंत पारदर्शक पध्दतीने केली जाते. प्रत्येक शाखेत उच्च विद्याविभूषित अधिकाऱ्यांची नेमुणक केलेली आहे. पाच राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांचे त्यांना अपेक्षित असलेल्या सर्व विषयांवर सातत्याने “सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट” प्रशिक्षण घेतले जातात.

धनंजय तांबेकर सर आपल्या संस्थेतील सर्व कर्मचाऱ्यांना कौटुंबिक वातावरण देत असतात. त्यांची काळजी देखील घेतात व एखाद्याच्या हातून चूक घडली तर त्यांच्यावर तात्काळ दंडात्मक कारवाई देखील करतात. संस्थेच्या माध्यमातून कर्ज वितरण करतांनाच योग्य व्यक्तीलाच दिले जाईल याची काळजी घेण्यात येते. हे नियोजन करीत असतांना खासदार हेमंतभाऊ पाटील आपला कुठलाही अडसर यात ठेवला नाही त्यामुळे कर्ज थकीत झाल्यास त्यांच्यावर योग्य ती दंडात्मक कारवाई देखील केली जाते. योग्य ती खबरदारी घेत असल्यामुळेच संस्था अल्पावधीतच नावारुपास आली आहे.
जागतिक महामारीच्या कोरोना काळात अनेक वित्तीय संस्थांनी आपले दरवाजे बंद केली, असतांना गोदावरी अर्बनने ग्राहकांना घरपोच सेवा दिली. इतकंच नव्हे तर सुट्या वगळता संस्थेची एकही शाखा बंद न ठेवता समाजिक अंतराचे सर्व नियम पाळत ग्राहकांना सेवा दिली. अनेक संस्था या काळात डबघाईला आल्या असता गोदावरी अर्बनने या मंदिची संधी ओळखत व्यवसाय सुरळीत ठेवत वृंध्दीगत केला, त्यामुळे संस्था नफ्यात राहिली. बऱ्याच दिग्गज संस्थांनी कोरोना काळात आपल्या कर्मचाऱ्यांना कमी केले असता गोदावरी अर्बनने एकही कर्मचारी कमी न करता उलट कर्मचाऱ्याना पगारवाढ, पदोन्नती दिली. त्या सोबतच दैनिक आवर्त ठेव प्रतिनिधीना या संकट काळात ‘कोविड अग्रीम’ देवून त्यांच्या कुटूंबियांना वैद्यकीय आधार देण्याचे काम संस्थेने केले.
काळाची पाऊले ओळखत विज्ञान युगात डिजीटल तंत्रज्ञानाचा स्विकार करीत गोदावरी अर्बनने “रेनिसन्स बिजनेस प्रोसेसिंग रिइंजिनिअरींग” मोड्युलची सुरुवात केली असून बँकिंग क्षेत्रातील नेमक्या अडचणी काय असतात, त्यावर आपण कोणत्या उपाय योजना केल्या पाहिजे, त्यासोबतच संस्थेमध्ये कर्ज वाटप करीत असतांना कोणती काळजी घेतली पाहिजे, योग्य कागद पत्रांची पडताळणी कशी करावी. या नविन तंत्रज्ञानचे संस्थेतील प्रशिक्षण धनंजय तांबेकर सरांनी सलग १५ दिवस सर्व शाखेतील प्रत्येक कर्मचाऱ्यांना दिले. अशा बहुआयामी धनंजय तांबेकर सरांना वाढदिवसाच्या अखंड अक्षय अगणिक शुभेच्छा…!

Copyright ©