यवतमाळ सामाजिक

लाडखेड येथे बि.सी.आय.प्रकल्पाअंतर्गत जागतीक कापूस दीन साजरा

लाडखेड प्रतिनिधी अन्सार खान ९४२२१९२६९१

लाडखेड येथे बि.सी.आय.प्रकल्पाअंतर्गत जागतीक कापूस दीन साजरा
———————————————

लाडखेड- जागतिक स्तरावरील पांढरे सोने म्हणून ज्यांची ओळख आहे असे कापूस सर्वांना माहीत आहे. कापूस उत्पादनापासून तर त्याचे संगोपन अश्या नानाविध उद्देशातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन व्हावे म्हणून विकास गंगा स्वयंसेवी संस्था घाटंजी यांचे मार्फत एका कार्यक्रमाचे आयोजन करून लाडखेड येथिल ग्राम पंचायत कार्यालयात ७ आॅक्टो. जागतीक कापूस दीन म्हणून साजरा करण्यात आला.
लाडखेड येथिल ग्राम पंचायत कार्यालयात आयोजित कापूस दिनाच्या कार्यक्रमात सर्व प्रथम माजी मुख्यमंत्री हरित क्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी बि.सि.आय. चे क्षेत्र प्रवर्तक प्रतिक निमकर यांनी कापूस पिकाची विस्तृत माहिती दिली. यात निरोगी पिक, एकात्मिक किड व्यवस्थापन, कापूस पिक घेतांना येणाऱ्या अडचणी यावर मुख्य भर देत मार्गदर्शन करण्यात आले. त्याच सोबत लाडखेड चे सरपंच माणिकराव चिरडे यांनी सुध्दा देशासह जागतिक स्तरावर कापसाला वाढती मागणी, बाजार भाव यासह अनेक बाबीवर प्रकाश टाकून उपस्थित शेतकरयांना माहिती दिली. यावेळी या कार्यक्रमाला उपसरपंच मनोज दुधे, तसेच बि.सी.आय. प्रकल्पातील शेतकरी प्रेमचंद दुधे, विजय दुधे, सलिम खान, वैभव गुल्हाने, प्रफुल निमकर, अब्दुल वहिद, अविनाश निमकर, विलास दुधे, गिरीश देऊळकर, चरण तायडे, संजय सोनकर, प्रफुल अस्वार, विशाल अस्वार, चेतन दुधे यांचे सह शेतकरी बांधव उपस्थित होते.

Copyright ©