यवतमाळ सामाजिक

यवतमाळ येथे शांतता समितीची बैठक संपन्न येथील शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले

जिल्हा प्रतिनिधी

यवतमाळ येथे शांतता समितीची बैठक संपन्न
येथील शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले

या प्रसंगी जावेद अली काझी आपले मत व्यक्त करताना म्हणाले की यवतमाळ येथील मा पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित जातीय सलोख्याचा दृषटिकोनातूनच तसेच नवरात्र दुर्गौउत्सव याचा बद्दल काय खबरदारी घ्यायला पाहिजे आणि कोरोनाचे नियम व अटी यांचे काटेकोरपणे पालन कशा प्रकारे करायला पाहिजे यावर विशेष माहिती देण्यात आली प्रत्येक सूचनेचे प्रत्येकाने पालन करणे आवश्यक असल्याने प्रत्येकानी याचे काटेकोर पने पालन करावे या करीता समितीने जागरूकता बाळगणे आवश्यक आहे
या बैठकीला उपस्थित जिल्हाधिकारी अमोल येडगे तसेच नगराध्यक्षा काचंनताई चौधरी यवतमाळ नगरपरिषद मुख्यकार्यकारी अधिकारी श्रीमती मडावी, तसेच जेष्ठ पत्रकार न, मा. जोशी एस डी पी. ओ. बक्षी तहसीलदार कुणाल झालटे तसेच ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक किशोर जुंनगरे यवतमाळ शहर पोलिस निरीक्षक पंत,अवधूतवांडी पोलीस निरीक्षक केदारे ,लोहारा पोलीस निरीक्षक गूगल , पत्रकार बंधू आणि इतर पदाधिकारी सैयद रिजवान,सैयद जाकिर,नितीन धोंगडे,नुर अली काझी यांचा समावेश होता जावेद आपले मत व्यक्त करताना जातीय सलोखा राखण्यासाठी काय उपाय योजना करायला पाहिजे तसेच सर्वांनी एकमेकांचा धर्माबद्दल आदर करणे खूप महत्वाचे आहे अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने दुर्गा उत्सव साजरा करणे काळाची गरज आहे.कोरोणाचे नियमाचे काटेकोरपणे पालन करून हे सण आणि उत्सव साजरा करायला पाहिजे जेणेकरून कोणाच्या भावना दुखावणार नाही आणि कुणाला बाधा होणार नाही उत्सव पण व्यवस्थितरित्या पार पडेल. याची आयोजकांनी खबरदारी घ्यायला पाहिजे या बाबत जावेद काजी यांनी मनोगत व्यक्त केले

Copyright ©