यवतमाळ सामाजिक

घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर भाविकांसाठी रेणुकामाता मंदिर मोकळे.भाजपने केला जल्लोष

माहूर प्रतिनिधी पद्मा गि-हे

घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर भाविकांसाठी रेणुकामाता मंदिर मोकळे.भाजपने केला जल्लोष

घटस्थापनेचा शुभ मुहूर्त साधून राज्य सरकारने राज्यातील सर्वच धार्मिक व प्रार्थनास्थळं भाविकांसाठी मोकळी करण्याचा निर्णय घेतला होता.त्याअनुषंगाने
दि. ०७ ऑक्टो.रोज गुरुवारला श्री रेणुका मातेचे मंदिरही उघडण्यात आल्याचे औचित्य साधून भारतीय जनता पक्षाच्या आध्यात्मिक आघाडीचे जिल्हा संयोजक तथा माहूरचे योगी श्यामबापु भारती महाराज यांचे नेतृत्वात व माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील,जिल्हा उपाध्यक्ष सुमित राठोड ,
यांचे प्रमुख उपस्थित भाजपा कार्यकर्त्यांनी गडावर जल्लोष केला.
भारतीय जनता पक्षाने मंदिरे व इतर धार्मिक स्थळे उघडावेत याकरीता राज्यभर शासनाच्या विरोधात आंदोलन छेडले होते. त्याची दखल घेवून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज पासून सर्वच मंदिरे व प्रार्थना स्थळे उघडण्याचा निर्णय घेतल्याचे सांगून मोठा जयघोष करीत भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.यावेळी तालुकाध्यक्ष अॅड. दिनेश येऊतकर,महीला मोर्चाच्या जिल्हा अध्यक्षा पदमा गि-हे, शहराध्यक्ष गोपू महामुने,शहराध्यक्ष अर्चना दराडे,संतोष पवार, विजय आमले, अविनाश भोयर, अर्जुन मोहिते, संतोष तामखाने, अमोल पाटील, राजू दराडे, हर्षदिपसिंह दिक्षित तसेच असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Copyright ©