यवतमाळ सामाजिक

वेदमंत्रांच्या जयघोषात रेणुकागडावर संपन्न झाली घटस्थापना.

माहूर प्रतिनिधी पद्मा गि-हे

वेदमंत्रांच्या जयघोषात रेणुकागडावर संपन्न झाली घटस्थापना.

सर्वदूर प्रख्यात असलेल्या श्री रेणुकादेवी मंदिरात दि. 7आॅक्टो. रोजी गुरुवारला स. 9 वाजण्याचे सुमारास मातेला रुद्राभिषेक घालण्यात आला.तद्नंतर श्रीसूक्त व वेद मंत्रांच्या जयघोषात पुजारी भगवानीदास भोपी व विश्वस्त चंद्रकांत भोपी यांचे हस्ते घटस्थापना संपन्न झाली.यावेळी जिल्हा न्यायाधीश कमल किशोरसिंह गौतम,संस्थानचे सचिव तथा सहाय्यक जिल्हाधिकारी किर्तीकिरण पुजार,कोषाध्यक्ष तथा तहसीलदार राकेश गिड्डे,विश्वस्त संजय काण्णव,अरविंद देव,दुर्गादास भोपी व शुभम भोपी यांची उपस्थिती होती.
घटस्थापना हा आजच्या आश्विन शुध्द प्रतिपदेचा विशेष उत्सव.घटस्थापना म्हणजे शरीर रूपी घटां मध्ये उत्तम विचार,आचाराचे बीजारोपण करणे हा होय.आज स्त्री शक्तीच्या पूजनाला विशेष महत्व असते.त्याच अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या भगवती रेणुकेच्या गाभाऱ्यात महाअभिषेका नंतर षोडश उपचार पूर्वक घटस्थापना संपन्न झाली.तद्नंतर कुमारीका पूजन व वेद पारायण करणाऱ्या वैदिकांचे यथासांग पूजन जिल्हा न्यायाधीश गौतम यांनी सपत्नीक केले. यावेळी माहूरचे न्यायाधीश पवनकुमार तापडीया, उपाध्यक्ष तथा उपविभागिय पोलीस अधिकारी विलास जाधव,विश्वस्त आशीष जोशी यांची उपस्थिती होती.

Copyright ©