यवतमाळ शैक्षणिक सामाजिक

जि.प.उच्च प्राथमिक डिजिटल केंद्र शाळा मुडाणा येथे सानेगुरुजी बालभवनाचे उद्घाटन

महागाव प्रतिनिधी

जि.प.उच्च प्राथमिक डिजिटल केंद्र शाळा मुडाणा येथे सानेगुरुजी बालभवनाचे उद्घाटन

शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ.उज्वल ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे माजी मुख्याध्यापक राम राठोड सर उपस्थित होते.सानेगुरूजी यांच्या प्रतिमेचे पुजन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सर्व शिक्षक वृंदांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक अवधुतराव वानखेडे यांनी केले.कोरोना काळात विद्यार्थ्यांचे प्रचंड शैक्षणिक नुकसान झाले असून ते झालेले नुकसान ऑफलाईन अभ्यासाद्वारेच प्रत्यक्ष वर्ग घेऊनच भरून निघू शकते असे त्यांनी म्हटले आहे.त्यासाठी विविध थोर विचारवंतांचे,कथा,गोष्टींचे, किशोर मासिक,जिवन शिक्षण,असे मिळून 300 च्या वर पुस्तकांची उपलब्धता शाळेला मुख्याध्यापकांनी मिळवून दिली.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पी.डी.राठोड यांनी अथक परिश्रम घेतले तर सानेगुरुजी यांच्या विचारांचे आचरण करणे हे अतिशय महत्वाचे आहे असे गजानन गोपेवाड विषय शिक्षक यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले, कार्यक्रम प्रसंगी अशोकराव लांडगे , रामलाल जाधव , पुंडलिक पोले सर, आकाश आंबेकर सर,कु.वनिता गोविंदवार ,कु.बिट्टूबाई लहाने ,कु.उषा शिंदे मॅडम इत्यादी शिक्षक मंडळी उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन पी.डी.राठोड सर यांनी केले तर आभार रामलाल जाधव सर यांनी मांडले.

Copyright ©