यवतमाळ सामाजिक

नगर परिषद चा कारभार भारी ,कोनीच उपस्थित नाही जवाबदार अधिकारी

संपादक सदानंद जाधव

नगर परिषद चा कारभार भारी ,कोनीच उपस्थित नाही जवाबदार अधिकारी 

मुख्याधिकारी पुन्हा सुट्टीवर तर उपमुख्यधिकारी बदली मुळे रवाना तर प्रभारी कोण ?

दिग्रस नगर परिषदेचा थंडावलले कारभार नागरिकांना कायम दिसून येते. न.प.चा कारभार का थंडावतो याचे मुख्य कारण मुख्याधिकारी कार्यालयालाच चक्क कामाच्या दिवशी कुलूप असल्याने तर नाही ना जनतेतून असा प्रश्न केल्या जात आहे .त्यामुळे मुख्याधिकारी नेमके कुठे आहेत?असा प्रश्न जनमानसातुन उपस्थित केला जात आहे.शासकीय सुट्टीच्या दिवशी कार्यालय कुलूपबंद असणे,ही मोठी बाब नाही.मात्र नियमित कामाच्या दिवशी चक्क नगर परिषद कार्यालयाच्या मुख्याधिकारी कक्षाला कुलूप असल्याने चर्चे चा विषय झाला आहे.
सोबतच नगर परिषद निगडित अन्य विभागाचे अधिकारी देखील अनेक वेळा उपस्थित नसल्याचे दिसून आले.न.प.च्या थंडावलेल्या कारभारा मुळे नाल्या तुंबून रस्त्यावर घाण पाण्याचे डबके साचने,जागो जागी केर कचरा दिसून येत आहे, सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्या गटारी वर झाकण नसल्याने दुर्गनधी पसरत आहे ,न.प.मार्फत मुत्रारीवर अवाढव्य खर्च करून लोखंडी मुतारी उपलब्ध करण्यात आल्या होत्या त्या नामशेष होणे,आठवड्यातुन एक दिवस पाणी पुरवठा अश्या एक ना अनेक समस्या प्रखर असताना न्याय मिळण्याच्या अपेक्षेने नगर परिषदचे दार ठोठावले तर मुख्याधिकारी कक्षाला कुलूप असेल तर जनतेनी न्याय कसे,कुठे या कोणाकडे मागावा, असा संतप्त सवाल नागरिक करीत आहेत

 

Copyright ©