Breaking News यवतमाळ सामाजिक

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची झीरपूर वाडी येथील फुटलेल्या पाझर तलावाची पाहणी

 संपादक सदानंद जाधव

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची झीरपूर वाडी येथील फुटलेल्या पाझर तलावाची पाहणी 

जि. प. उप सिंचन विभाग अधिकारी पुसद यांना सुनावले खडे बोल 

१५ दिवसा पूर्वी झिरपून वाडी येथील पाझर तलाव फुटून शेता मध्ये पाणी जाऊन मोठ्या संख्येत शेतमालाचे नुकसान झाले.त्या सह झीरपूरवाडी ला ज्या विहिरी मार्फत पाणी पुरवठा होतो त्या विहिरी मध्ये या तलावाचे पाणी शिरल्याने गेल्या १५ दिवसा पासून झीरपूर वाडी गावात पाणी पुरवठा खंडित होता.झीरपूर वाडीचे सरपंच कुडवे यांनी  जि. प सिंचन विभाग पुसद यांच्या कडे अनेक वेळा पाठपुरावा करून दाद मागितली असता सिंचन विभागाकडून कुठली ही दाद मिळत नसल्याने.जिल्हा अधिकारी यांच्या कडे निवेदन देऊन दाद मागितली असता आज दिनांक ६/१०/२०२१ ला २:३० च्या दरम्यान जिल्हा अधिकारी अमोल येडगे पाझर तलाव पाहणी करण्यासाठी झिरपूर वाडी आले असता त्यांनी जि.प उपसिंचन विभाग पुसदच्या अधिकाऱ्यांना सुनावले खडे बोल व पाणी पुरवठा विभाग पुसद च्या अधिकाऱ्यांना तात्काळ काम पूर्ण करण्याचे आदेश दिले

Copyright ©