यवतमाळ सामाजिक

गुरुवारला वंचित बहुजन आघाडीची बैठक

वणी तालुका प्रतिनिधी:- निलेश अ.चौधरी

गुरुवारला वंचित बहुजन आघाडीची बैठक

नगर परिषदेच्या निवडणुकी संदर्भात होणार चर्चा व जबाबदारीचे वाटप

वणी येणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकी संदर्भात सर्व पदाधिकाऱ्यांची जबाबदारी व नवं नियुक्त शहर कार्यकरणीचे नियुक्ती पत्र वाटप करण्यासाठी गुरुवार ता. ७ रोजी स्थानिक विश्राम गृहात दुपारी १२ वाजता एका बैठकीचे आयोजन केले आहे.
नगर परिषदेच्या निवडणुका अगदी तोंडावर आल्या असून निवडणुकीचे योग्य नियोजन झाले पाहिजे. व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी योग्य भूमिका बजावली त
पाहिजे त्यासाठी त्यांनी जबाबदारीने आपले कार्य पार कसे पडावे यासाठी वंचितचे तालुकाध्यक्ष दिलीप भोयर यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हाउपाध्यक्ष मंगल तेलंग, जेष्ठ नेते मिलिंद पाटील, जिल्हा सल्लागार अँड विप्लव तेलतुबंडे भरत कुमरे जिया अहेमद, चंद्रसेन जीवने, जिल्हा संघटक सुभाष लसंते, तालुका महासचिव सतीश गेडाम, यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक संपन्न होत आहे.तरी सर्व शहर कार्यकारणी आजी माजी पदाधिकारी हितचिंतकांनी व सर्व कार्यकर्त्यांनी न चुकता उपस्थित राहावे असे आवाहन शहराध्यक्ष किशोर मून यांनीं केले आहे अशी माहिती प्रसिद्धी प्रमुख रमेश तांबे यांनी कळविले आहे.

Copyright ©