बेला प्रतिनिधी (उमरेड) कैलास साठवणे
मानस ऍग्रो इंडस्ट्रीज युनिट 01 साखर कारखाना बेला येथील कर्मचारी संपावर
बेला परिसरातील मानस ऍग्रो इंडस्ट्रीज युनिट 01 साखर कारखाना बेला येथील कर्मचाऱ्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने अखेर येथील कर्मचाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी 1 ऑक्टोंबर पासून बेमुदत संप पुकारला आहे तेथील कामगारांना बरेच महिन्यापासून वरिष्ठांकडून आश्वासन मिळून सुद्धा या मागण्या पूर्ण होत नसल्यामुळे येथील कर्मचाऱ्यांनी कंपनी व्यवस्थापनास या अगोदर संपाची नोटीस बजावली होती
येथील कर्मचारी युनियन संघटना बेला येथील सर्व कर्मचारी कामगार यांनी दिनांक 1 ऑक्टोंबर पासून मागण्या पूर्ण होईपर्यंत संप पुकारला आहे. कर्मचारी युनियन तर्फे बऱ्याच मागण्या प्रलंबित असल्याने संप पुकारण्यात आला असल्याचे सांगितले जाते. मात्र एप्रिल 2021 पासून येथील कारखाने कामगारांना पगार वाढ तसेच कामगार कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी भरणा करण्यासंबंधात पत्र सादर करण्यात आले होते परंतु अजून पर्यंत कामगारांना पगार वाढ तसेच भविष्य निर्वाह निधीची रक्कम भरना केली नसल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगितले जाते फक्त कोरडे आश्वासन मिळतात त्यावर अंमलबजावणी केली जात नसून आश्वासनांची खैरात दिली जात असल्याचे सांगितले या विषयावर चर्चा केली जात नाही त्यामुळे तो तोडगा निघत नसल्याने कर्मचारी संघटनेकडून आरोप करण्यात येत आहे अरुणा काळातही कामगार कर्मचारी कंपनीच्या पाठिशी उभी असून सुद्धा कर्मचाऱ्यांच्या भविष्याचा विचार सुद्धा करण्यात आला नसल्याचे सांगितले जाते कंपनीकडून कर्मचाऱ्यांचा विचार करून मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी करण्यात येत आहे.
कामगार कर्मचाऱ्यांच्या मागण्या
1) एप्रिल 2019 पासून भविष्य निर्वाह निधीचा भरणा त्वरित करण्यात यावा.
2) शासन निर्णयानुसार बारा टक्के महागाई भत्ता
3) दोन ते तीन महिने होऊनही पगार वेळेवर मिळत नसून पगार मिळण्याची तारीख निश्चित करावी व त्याच तारखेला पगार द्यावा.
4) कर्मचाऱ्यांना दिवाळीला बोनस देण्यात यावा व तो दिवाळी सणाचा एक महिना अगोदर द्यावा.
आज दिनांक 4.ऑक्टोंबर 21 रोजी संपाच्या चौथ्या दिवशी परिसरातील आमदार राजूभाऊ पारवे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन व्यवस्थापनाशी चर्चा करून यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला परंतु अजूनही यावर तोडगा निघाला नाही त्यामुळे आज हा संप कायम होता.गेल्या एक ऑक्टोंबर पासून आमच्या मागण्या साठी आंदोलन सुरू आहे मात्र कंपनीच्या कुठल्याही अधिकाऱ्यांनी दखल घेतली नसून अधिकारी या विषयावर बोलायला तयार नाही आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही माघार घेणार नाही असा इशारा यशवंत डेकाटे यांनी दिला
Add Comment