यवतमाळ सामाजिक

शिक्षणाधिकारी यांची सावंगा (बु)”शाळेला भेट.

संपादक सदानंद जाधव

शिक्षणाधिकारी यांची सावंगा (बु)”शाळेला भेट.

यवतमाळ जिल्हयाचे शिक्षणाधिकारी प्रमोद सुर्यवंशी,गटशिक्षणाधिकारी मुकेश कोंडावार, केंद्र प्रमुख किरण बारसे यांनी आज दिग्रस पंचायत समिती येथील जि.प.उच्च प्राथमिक शाळा,सावंगा बु” शाळेला भेट दिली.
जवळजवळ दिड वर्षा नंतर संपुर्ण महाराष्ट्रात आज पासुन प्रत्यक्ष शाळेला सुरूवात झाली आहे. शहरी भागातील वर्ग ८ ते १२ तर ग्रामीण भागातील वर्ग ५ ते १२ पर्यंत चे वर्ग आज पासून सुरू झाल्यात. दोन विद्यार्थ्यां मधील अंतर,वारंवार हात धुणे, सँनिटाईज करणे असे कोविडचे नियम पाळून शाळा सुरू करण्यात आल्या आहे. सावंगा बु येथील शाळेत वरील सर्व नियमांचे पालन करतांना दिसुन आले. उपस्थित प्रत्येक विद्यार्थ्यांचे तापमान मोजणे,आँक्सीमीटर द्वारे आँक्सीजनची पातळी मोजून त्यांची नोंद केल्याचे आढळून आल्याने शिक्षणाधिकारी प्रमोद सुर्यवंशी यांनी समाधान व्यक्त केले. या प्रसंगी गटशिक्षणाधिकारी मुकेश कोंडावार केंद्र प्रमुख किरण बारसे यांचे हस्ते विद्यार्थ्यांना नविन पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले.त्यानी नविन सत्रातील खबरदारी व शैक्षणिक उपक्रमां विषयी मार्गदर्शन केले.
जि.प.शाळेचे मुख्याध्यापक गजानन तुंडलवार यांनी मान्यवरांचे पुष्प गुच्छ देवून स्वागत केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पदवीधर शिक्षक संतोष झाडे यांनी केले.आभार गुलाब तायडे यांनी केले. शशिकला कैलासवार, रजनी डिके,अर्चना पाटील, रजनी तायडे, संगीता अस्वार ह्या शिक्षकांसह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©