Breaking News यवतमाळ सामाजिक

अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तीन महिने अत्याचार

वणी तालुका प्रतिनिधी निलेश चौधरी

अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तीन महिने अत्याचार

तालुक्यातील नवीन वाघदरा येथे वास्तव्यास असलेल्या, एका अल्पवयीन मुलीला तीन महिन्या आधी शहरातील दामले फैल येथील एका मजनुने, लग्नाचे आमिष दाखवून पळून नेल्याची घटना उघडकीस आली.
सविस्तर वृत्त असे की, शहरातील एका महाविद्यालयामध्ये नवव्या वर्गात शिकत असलेली, अल्पवयीन तरुणी हिच्या मागे काही महिन्या आधी शहरातील दामले फैल येथील, माथेफिरू मजनू, हा लागला होता. त्या माथेफिरू मजनुने, अल्पवयीन मुली सोबत जवळीक निर्माण करून बोलचाल सुरुवात केली. आणि तिला प्रेमाचे व लग्नाचे आमिषे देऊ लागला. मुलगी लहान असल्याने, त्या मजनूचा डाव ती मुलगी समजू शकले नाही. आणि त्याच्या जाळ्यात पिडीता फसली. 2 जुलै सकाळी पाच वाजताच्या सुमारास मुलगी घरात नसल्याने, मुलगी बेपत्ता झाल्याचे पालकांच्या लक्षात आले.त्यानी शेजारी व नातेवाईकांकडे शोधा-शोध सुरू केली. परंतु मुलगी कुठेही आढळुन आली नाही. त्यामुळे त्यांनी पोलिस स्टेशन गाठत मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात कलम 363 नुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणात पोलीस निरीक्षक श्याम सोनटक्के यांच्या मार्गदर्शनात एपीआय संदीप एकाडे हे तपास करत होते.आणी (२ आॅक्टो.) शनिवारला, अल्पवयीन मुलगी ही शहरातील दामले फैल परिसरामध्ये असल्याचे, गुप्त हेरांकडुन माहिती मिळाली,याच माहीतीच्या आधारे, पोलीस पथकाने छापा टाकून, त्या अल्पवयीन मुलीची सुटका केली.परंतु माथेफिरू मजनू हा फरार झालेला होता. त्या अल्पवयीन तरुणीला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून, फूस लावून तिच्यावर लैंगिक शोषण केल्याचे उघडीस आले. त्यामुळे पोलिसांनी आरोपींविरुद्ध भांदवी ३७६ पोस्को कलम ४ व ६ नुसार गुन्हा दाखल केला. माथेफिरू मजनु हा फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहे. समोरील तपास पोलीस निरीक्षक श्याम सोनटक्के यांच्या मार्गदर्शनात एपीआय एकाडे व माया चाटसे करीत आहे.

Copyright ©