Breaking News यवतमाळ सामाजिक

गेल्या 24 तासात नवीन पॉझिटिव्ह नाही

जिल्हा प्रतिनिधी

गेल्या 24 तासात नवीन पॉझिटिव्ह नाही

 

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2168 बेड उपलब्ध

 

यवतमाळ दि. 3 ऑक्टोबर : गेल्या 24 तासात जिल्ह्यात नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आला नाही तसेच कोणीही कोरोनामुक्त झाले नाही. सध्या ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात सहा व बाहेर जिल्ह्यात तीन अशी एकूण नऊ आहे.

जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 359 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह नसल्याने सर्व 359 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72886 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 71090 आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1787 मृत्यूची नोंद आहे.

जिल्ह्यात आतापर्यत सात लक्ष 45 हजार 892 चाचण्या झाल्या असून त्यापैकी सहा लक्ष 72 हजार 998 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 9.77 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी 0.0 आहे तर मृत्यूदर 2.45 आहे.

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2168 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 16 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2174 आहे. यापैकी 6 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 2168 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 787 बेडपैकी 6 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 781 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 755 बेडपैकी पुर्ण 755 बेड शिल्लक आणि 16 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 632 बेडपैकी पुर्ण 632 बेड शिल्लक आहेत.

______________________________________

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व्यवहारीकदृष्ट्या शक्य जागेवरच- पालकमंत्री संदिपान भुमरे

यवतमाळ दि. 3 ऑक्टोबर : उमरखेड येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याकरिता शासनाचे नियम, परवानग्या व अटिंची पुर्तता करून व्यवहारीकदृष्ट्या शक्य असलेल्या जागेचीच निवड करण्यात येईल, मात्र तोपर्यत या मुद्द्यावर लोकांच्या भावना दुखावून कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न केल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही असा इशारा देखील पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी दिला आहे.

उमरखेड येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा संघर्ष समिती व स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या समवेत पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी शासकीय विश्रामगृह येथे काल चर्चा केली. याप्रसंगी उमरखेड मतदार संघाचे आमदार नामदेव ससाणे, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, तहसिलदार आनंद देवूळगावकर, नगरपालीकेचे मुख्याधिकारी, सार्वजनिक बांधकाम, पोलीस व विद्युत विभागाचे अधिकारी प्रमुख्याने उपस्थित होते.

पालकमंत्री यांनी यावेळी सांगितले की या विषयावर अनेक निवेदने प्राप्त झाल्याने संबंधीत विषय समजून घेण्याच्या दृष्ट्रीने आजच्या चर्चेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी त्यांनी उमरखेड येथील संघर्ष समिती, लोकप्रतिनिधी, तहसिलदार,नगरपालीकेचे मुख्याधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता, पोलीस अधिकारी व या संबंधाने निवेदन देणाऱ्यांचे म्हणणे एकूण घेतले.

________________________________________

अमृत योजनेसाठी एक महिन्याची मुदत पालकमंत्री संदिपान भुमरे

यवतमाळ दि. 3 ऑक्टोबर : शहरातील अमृत पाणीपुरवठा योजनेचे काम पुर्ण करण्यास शेवटची एक महिन्याची मुदत देण्यात येत आहे तसेच आतापर्यंत झालेल्या विलंबाची जबाबदारी देखील निश्चित करण्यात यावी, असे निर्देश पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी पाणी पुरवठा विभाग व कंत्राटदार यांना दिले आहे.

अमृत अभियानाअंतर्गत यवतमाळ वाढीव पाणी पुरवठा योजनेचा आढावा पालकमंत्री भुमरे यांनी शासकीय विश्रामगृह येथे घेतला. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, नगराध्यक्षा कांचन चौधरी, महाराष्ट्र जीवन प्राधिकारणचे कार्यकारी अभियंता प्रफुल व्यवहारे, उपकार्यकारी अभियंता निखील कवटकर, कंत्राटदार अक्षय आडके इ. प्रामुख्याने उपस्थित होते.

बेबळा प्रकल्पापासून जलशुद्धीकरण केंद्राच्या टाकीपर्यंतचे काम पुर्ण झाले आहे व शहराच्या मुख्य संतुलन टाकीपर्यंत पाणी पोहचले आहे. तेथून पाण्याच्या तीन मुख्य टाक्या आणि त्यातून 25 वितरण व्यवस्थेच्या जलकुंभात पाणी पोहचून घरोघरी वितरीत होणार आहे. योजनेचे 90 टक्के काम पुर्ण झाले असून टेस्टिंगचे महत्वाचे काम पुर्ण झाल्यावर लवकरच पाणी पुरवठा सुरू होईल, अशी माहिती कार्यकारी अभियंता व्यवहारे यांनी बैठकीत सादर केली.

यावेळी पाणी पुरवठाशी संबंधीत अधिकारी उपसि्थत होते.

______________________________________

मोफत सात-बारा वितरण मोहिमेचे पालकमंत्र्यांचा हस्ते उद्घाटन

यवतमाळ दि. 3 ऑक्टोबर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीनिमित्त महसूल विभागार्मात सर्व खातेदारांना मोफत सात-बारा वितरण मोहिम सुरू करण्यातआली आहे. यवतमाळ जिल्ह्यात या मोहिमेचे उद्घाटन पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते विश्रामगृह येथे काल प्रातिनिधीक स्वरूपात निवडक शेतकऱ्यांना सात-बारा चे वितरण करून करण्यात आले.

याप्रसंगी जिलहाधिकारी अमोल येडगे, नगराध्याक्षा कांचन चौधरी, निवासी उपजिलहाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, उपविभागीय अधिकारी अनिरूद्ध बक्षी, तहसिलदार कुणाल झाल्टे प्रामुख्याने उपस्थित होते.

Copyright ©