यवतमाळ सामाजिक

वानोळा येथे आझादी अम्रुत महोत्सव अंतर्गत कायदेविषयक जनजागृती शिबिर संपन्न.

माहूर प्रतिनिधी पदमा गि-हे

वानोळा येथे आझादी अम्रुत महोत्सव अंतर्गत कायदेविषयक जनजागृती शिबिर संपन्न.

अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी कायदेविषयक ज्ञान असून गरजेचे.
न्यायाधिश पवनकुमार तापडिया.

तालुक्यातील वानोळा येथे ग्राम पंचायत कार्यालयात तालुका विधी सेवा समिती, वकील संघ. व पंचायत समिती माहूरच्या संयुक्त विद्यमाने आझादी अम्रुत महोत्सव अंतर्गत दिनांक 2 ऑक्टोंबर 2021 रोजी शनिवारी सकाळी नऊ वाजता माहूर न्यायालयाचे न्यायाधिश पवनकुमार तापडिया यांच्या अध्यक्षतेखाली युवराज मेहेत्रे गटविकास अधिकारी, स.पो.नी.अण्णासाहेब पवार,अॅड संजय एस. राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत
कायदेविषयक जनजागृती शिबिर संपन्न झाले. मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधी, लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली,अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी कायदेविषयक ज्ञान असने। आवश्यक असल्याचे मत यावेळी न्यायाधिश पवनकुमार तापडिया यांनी व्यक्त केले .
यावेळी मान्यवरांच्या हस्ते व्रुक्षारोपन करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड. दिनेश येउतकर यांनी केले. तर अॅड. ए. एम .ढगे यांनी जेष्ठ नागरिकांचे अधिकार व म्रुत्यु प्रमाणपत्र, महीला वकील एस. व्ही. कपाटे यांनी महिलांचे पोटगीविषयक अधिकार अॅड भवरे यांनी शिक्षणाचा अधिकार .तर लोकन्यायालय मध्यस्थीचे फायदे याबाबत अॅड. सी. एम राठोड,यांनी मार्गदर्शन केले तर गटविकास अधिकारी युवराज मेहेत्रे यांनी शासनाच्या विविध योजनांची विस्तृत माहिती दिली.या। शिबीरारात वानोळा व आजूबाजूच्या परिसरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सहा. पोलीस निरीक्षक अण्णासाहेब पवार यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सरपंच रवी मांडके यानी केले तर आभार प्रदर्शन डॉ. अभिजीत राठोड यांनी केले.

Copyright ©