यवतमाळ सामाजिक

पारवा येथिल स्व. ताराबाई इंग्लिश मिडीयम स्कूल चा प्रबुद्ध कांबळे नवोदय परीक्षेत पात्र

कार्यकारी संपादक राजू चव्हाण

पारवा येथिल स्व. ताराबाई इंग्लिश मिडीयम स्कूल चा प्रबुद्ध कांबळे नवोदय परीक्षेत पात्र
———————————————
घाटंजी- तालुक्यातील पारवा येथिल स्व. ताराबाई इंग्लिश मिडीयम स्कूल चा प्रबुद्ध संतोष कांबळे याने नवोदय ची परीक्षा यशस्वी करून तो या परीक्षेत पात्र ठरल्याने त्याची बेलोरा जवाहर नवोदय विद्यालयात निवड झाली आहे.
शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेणारी स्व. ताराबाई इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये नेहमीच शैक्षणिक उपक्रम राबविले जातात. गुणवत्ता पूर्ण शाळा मानल्या जाणाऱ्या स्व. ताराबाई इंग्लिश मिडीयम स्कूल चा वर्ग पाचवीत शिकणारा प्रबुद्ध संतोष कांबळे हा नवोदय परीक्षेस बसला होता. यात तो पात्र ठरल्याने त्याची बेलोरा येथिल नवोदय विद्यालयात निवड झाल्याचे स्व. ताराबाई इंग्लिश मिडीयम स्कूल व्यवस्थापनाचे अध्यक्ष संदीप जयस्वाल यांनी कळविले आहे. प्रबुद्ध याने अथक परिश्रम घेवून हे यश संपादन केले. या निवडीचे श्रेय तो वर्ग शिक्षिका शैलजा पांढरकर, मार्गदर्शिका शिक्षिका रश्मी पलकंडवार, स्वाती आरेवार, गीता तुमराम यांचे सह आई बाबांना देतो आहे. या निवडीने प्रबुद्ध चे स्व. ताराबाई इंग्लिश मिडीयम स्कूल चे संस्थापक अध्यक्ष संदीप जयस्वाल, सचिव प्रमोद कांबळे, संचालिका रोशनी जयस्वाल, मुख्याध्यापिका गीता तुमराम यांनी कौतुक केले असून त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.

Copyright ©