यवतमाळ सामाजिक

खडकी येथे मोफत संगणीकृत सात बारा चे तहसीलदार यांच्या हस्ते वाटप

कार्यकारी संपादक राजू चव्हाण

खडकी येथे मोफत संगणीकृत सात बारा चे तहसीलदार यांच्या हस्ते वाटप
—————————————————–
घाटंजी:- तालुक्यातील चोरांबा साजा अंतर्गत येणाऱ्या मौजा खडकी या आदिवासी बहुल गावामध्ये स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त गांधी जयंती पासुन सुरु झालेल्या मोफत संगणकीकृत सातबारा चे वाटप तहसिलदार पुजा माटोडे यांच्या हस्ते करण्यात आले.
शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा घटक असणारा गाव नमुना सात बारा हा डिजीटल स्वाक्षरीतील सुधारीत नमुन्यात तयार करण्यात आला असुन त्याचे राज्यातील सर्व शेतकऱ्यांना मोफत वाटप करण्याचा महत्वकांक्षी प्रकल्प राज्य शासनाने गांधी जयंती पासुन सुरू केला असुन त्यामध्ये शेतकऱ्यांना मोफत संगणीकृत सातबारा वाटप केल्या जाणार आहे.तसेच सातबारा मध्ये काही चुका किंवा विसंगती आढळल्यास त्याबाबतचा अभिप्राय सहपत्रातील नमुन्यात भरून द्यायचा आहे, त्यामुळे सातबारा हा अचुक होईल . असे मत तहसिलदार यांनी व्यक्त केले.
यावेळी मंडळ अधिकारी एस.के.फुलमाळी तलाठी राजु मानकर, कोतवाल अजय पडलवार व गावातील सर्व शेतकरी बांधव उपस्थीत होते.

Copyright ©