यवतमाळ सामाजिक

कोपरी (खुर्द) जि. प. शाळेतील भाविका पेंदोर नवोदय परीक्षेत पात्र

कार्यकारी संपादक राजू चव्हाण

कोपरी (खुर्द) जि. प. शाळेतील भाविका पेंदोर नवोदय परीक्षेत पात्र
———————————————-
घाटंजी- तालुक्यातील दुर्गम भागात वसलेल्या यरंडगाव केंद्रांतर्गत मधील कोपरी (खुर्द) जिल्हा परिषद शाळा येथिल पाचव्या वर्गात शिकणारी कुमारी भाविका नंदू पेंदोर ही नवोदय परीक्षेत पात्र ठरली आहे.
आदिवासी बहुल तालुक्यातील आदिवासी समाजातील भाविकाने अथक परिश्रम घेवून नवोदय परीक्षेत घवघवीत यश मिळवून नवोदय साठी पात्र ठरल्याने कोपरी खुर्द सह तालुक्याचे मान उंचावले आहे. तिला यशाचे शिखर गाठण्यासाठी कोपरी (खुर्द) खुर्द जिल्हा परिषदेचे मुख्याध्यापक तथा विषय शिक्षक शरद टेंभेकर यांनी वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन केले असल्याचे भाविका च्या पालकांनी यावेळी सांगितले
आपल्या यशाचे श्रेय ती मुख्याध्यापक शरद टेंभेकर, विषय शिक्षक बोपटे, विषय शिक्षक तायडे, सहाय्यक शिक्षिका नरांजे, वर्गशिक्षक गिनगुले यांना देत असून ती या परीक्षेत पात्र ठरल्याने शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेशजी ढाले, घाटंजी पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकारी गुल्हाने, विस्तार अधिकारी (शिक्षण) वैद्य, माजी केंद्रप्रमुख वंदना तिवारी, केंद्रप्रमुख सुनिल बोंडे, शेडमाके, बी. आर. सी. साधनव्यक्ती मानव लढे, व यरंडगाव केंद्रातील सर्वत्र मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग त्याच प्रमाणे शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांनी तिचे कौतुक केले आहे. आणि तिला तिच्या पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Copyright ©