Breaking News यवतमाळ सामाजिक

नाकापार्डीच्या लाकुड चोरांना वनरक्षकांचा दणका

हिवरी वनपरीक्षेञातील

नाकापार्डीच्या लाकुड चोरांना वनरक्षकांचा दणका
================
एक आरोपी ताब्यात दोन आरोपी फरार गुन्हा दाखल

यवतमाळ वनविभाग तील हिवरी वनपरीक्षेञाच्या, नाका पार्डी परीमंडळाच्या, घाटाना (लोणी)नियत क्षेञात कक्ष क्रमांक २७०मध्ये,मौल्यवान सागवान वृक्षाची कत्तल करणा-या लाकुड चोरांना वनरक्षकांनी रंगेहात पकडले. ऊतम विठ्ठल सरवरे ,पांडुरंग नथ्थुजी राऊत, गोविंदा नागोराव राऊत, सर्व राहणार नाका पार्डी अशी आरोपींची नावे आहेत. यांचेवर भारतीय वन अधिनियम १९२७चे कलम २६(१)ड.फ.अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन, ऊत्तम विठ्ठल सरवरे याला ताब्यात घेतले आहे. तर पांडुरंग राऊत आणि गोविंदा राऊत हे दोन आरोपी फरार आहेत. त्यांचा शोध वन विभागाचे पथक घेत आहे. घाटाना लोणी नियत क्षेञात महीला वनरक्षक कु.पुजा फुके, वनरक्षक व्ही. व्ही. बांगर. वनरक्षक शिंदे. वनमजुर सज्जन गायकवाड संकेत चोले, आदी वनकर्मचा-यांनी, वनपरीक्षेञ अधीकारी प्रशांत बहादुरे यांचे मार्गदर्शनाखाली ही धाडसी कारवाई केली. लाकुड चोरांच्या वन कर्मचा-यांनी मुसक्या आवळुन वन कायद्याचा दणका दिल्याने सागवान चोरांचे धाबे दणाणले आहे. आरोपी कडुन मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन, पुढील तपास वन परीक्षेञ अधिकारी प्रशांत बहादुरे यांचे मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

Copyright ©