यवतमाळ सामाजिक

ड्रोन सर्व्हेक्षण कार्यात ग्रामस्थांनी सहकार्य करावे. – ग्रामसेवक विजयकुमार ठेंगेकर

 

ड्रोन सर्व्हेक्षण कार्यात ग्रामस्थांनी सहकार्य करावे.
– ग्रामसेवक विजयकुमार ठेंगेकर

ग्राम विकास विभाग,भूमि अभिलेख विभाग व सर्वे ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यामध्ये गावठाणाचे ड्रोन सर्व्हेक्षणाचे काम सुरू झाले असून या कामी सर्व ग्रामस्थांनी सहकार्य करावे असे आवाहन ग्रामपंचायत वरुड भक्ताचे सचिव विजयकुमार ठेंगेकर यांनी केले आहे.

आर्णी तालुक्यातील वरुड भक्त येथे ड्रोन सर्व्हेक्षणाच्या दृष्टीने नुकतीच भूमी अभिलेख कार्यालयाच्या चमूने भेट देऊन गावठाणाची हद्द कायम करणे, मालमत्ता धारकांच्या मालमत्तांचे सिमांकन करणे, मालमत्तांवर नंबरींग करणे यासारखी ड्रोन सर्व्हेक्षणाची पूर्व तयारी पूर्ण केली असून यावेळी ग्रामसेवक विजयकुमार ठेंगेकर यांच्यासह भूमी अभिलेख कार्यालयाचे एस. आर. मस्के, दिलीप भोयर, व्हि. एन.दिवेकर आणि सिद्धार्थ वाघमारे यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी त्यांनी या ड्रोन सर्व्हेक्षणासाठी सर्व ग्रामस्थांनी सहकार्य करून आपल्या मिळकत पत्रिका कशा अचूक तयार होतील यासाठी प्रयत्न करावा. असे आवाहन केले.

यावेळी ग्रामपंचायत वरुड भक्त चे प्रभारी सरपंच अरविंद चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य सुरेश काळे, ग्रामपंचायत कर्मचारी नरेंद्र काळे, ऑपरेटर गणेश राठोड, रोजगार सेवक सुधाकर निंबाळकर यांच्यासह ग्रामस्थ मंडळी उपस्थित होती.

ड्रोन मोजणी चे ग्रामपंचायतीस होणारे फायदे

1. ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व मालमत्ता या मालमत्ता कराची व्यक्ती करता येतील त्यामुळे ग्रामपंचायत महसुलात वाढ होईल
2. ग्रामपंचायत कडून मालमत्ता कर निर्धारण पत्रक नमुना 8 आपोआप/स्वयंचलनाने तयार होईल
3. कर आकारणी आपोआप अद्यावत होणार आहे.
4. गावठाण हद्दीतील प्रत्येक मिळकतीचा नकाशा तयार होईल व प्रत्येक मिळकतीच्या सीमा निश्चित होतील
5. गावठाणातील प्रत्येक मिळकतीचे नेमके क्षेत्र माहित होईल
6. गावठाणातील प्रत्येक मिळकतीचे मालकी हक्काचे अभिलेख मालमत्ता पत्रक तयार होईल.
7. ग्रामस्थांचे नागरी हक्काचे संरक्षण होईल.
8. गावातील रस्ते शासनाच्या/ ग्रामपंचायतीच्या खुल्या जागा नाले यांच्या सीमा निश्चित होऊन अतिक्रमण रोखता येईल.
9. मिळकत पत्रिका तयार झाल्यामुळे घरावर कर्ज घेण्याची सुविधा उपलब्ध होईल.
10. मिळकतींना बाजारपेठेमध्ये तरलता येऊन गावाची पत उंचावेल.
11. ग्रामपंचायतीला गावातील कर आकारणी,बांधकाम परवानगी, अतिक्रमण निर्मूलन यासाठी अभिलेख व नकाशे उपलब्ध होईल.

12. गावातील मालकी हक्क व हद्दी याबाबतचे वाद मिटतील.

ड्रोन मोजणीचे ग्रामस्थांना होणारे फायदे 1. प्रत्येक धारकाचे जागेचा/ मिळकतीचा नकाशा तयार होईल व सीमा निश्चित होतील व मिळकतीचे नेमके क्षेत्र माहित होईल.
2. प्रत्येक धारकाला आपले मिळकतीची मालकी हक्क संबंधी मिळकत पत्रिका व सनद मिळेल.
3. गावठाणातील जागेची मिळकत पत्रिकेस शेतीचे 7/12 प्रमाणेच धारकाचे मालकी हक्काचा पुरावा म्हणून कायदेशीर दृष्ट्या मान्यता आहे.
4. मिळकत पत्रिके आधारे संबंधित धारकास बँक कर्ज उपलब्ध होऊ शकते, तारण करता येईल, जामीनदार म्हणून राहता येईल, विविध आवास योजनाचा लाभ घेता येतील.
5. बांधकाम परवानगीसाठी मिळकत पत्रिका आवश्यक आहे.
6. सीमा माहीत असल्यामुळे धारकांना आपले मिळकतीचे संरक्षण करता येईल.
7. गावठाणातील जमीन विषयक मालकी हक्काबाबत व हद्दीबाबत निर्माण होणारे वाद संपुष्टात आणण्यास गावठाण भूमापन नकाशे व अभिलेखांचा उपयोग होईल.
8. मिळकती संबंधी बाजारपेठेमध्ये तरलता येऊन आर्थिक पत उंचावेल.

Copyright ©