यवतमाळ सामाजिक

राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

कार्यकारी संपादक राजू चव्हाण

राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री जयंती साजरी
———————————————–
घाटंजी :- स्थानिक एस.पी.एम. विध्यालय घाटंजी येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य रामकृष्ण कोडापे तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ शिक्षक मनोज बुरांडे, संदीप गोडे होते. मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्राचार्य रामकृष्ण कोडापे , मनोज बुरांडे, संदीप गोडे, राजेंद्र वातीले यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. यावेळी ज्ञानेश्वर मस्के, महेश वाघाडे, संदीप नखाते, अनुप मानकर,समिर अहिरकर, प्रशांत उगले, गौतम मेश्राम,विजय भगत,आकाश अहिरकर, विनोद ठाकरे, स्मिता पडवे, चारुशीला पंधरे, जयमाला जुमनाके, मंजुषा इंगोले , प्रफुल्ला गुल्हाने प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गजानन उत्तरवार, गजानन इंगोले, भगवान चुनारकर, कवडू ढाले यांनी पुढाकार घेतला.

Copyright ©