Breaking News यवतमाळ सामाजिक

वाघाच्या अस्तित्वाने कायर परिसरामध्ये दहशतीचे वातावरण

वणी तालुका प्रतिनिधी:- निलेश अ.चौधरी

वाघाच्या अस्तित्वाने कायर परिसरामध्ये दहशतीचे वातावरण.

वाघाच्या हल्ल्यात गोडगाव येथील शेतकऱ्याची गाय ठार

तालुक्यातील कायर परिसरात वाघाने चांगलीच दहशत केली असुन, वाघाच्या दहशतीमुळे नागरिक मोठ्या प्रमाणात धास्ताविले आहे. असाच काहीसा प्रकार कायर शिवारातील, गोडगाव येथील शेतकरी अनिल शंकर दोरखंडे यांच्या सोबत घडला असुन त्यांच्या गायीवर वाघाने हल्ला करुन शिकार केली आहे.यापुर्वी विरकुंड शिवारात वाघीण व शेतकऱ्याची आमने सामने नजारानजर झाली.मात्र वाघाणे डरकाळी फोडल्या नंतर शेतकरी प्रसंगावधान साधत सरळ झाडावर चढला त्यामुळे त्याचे सतर्कतेने काही अनुचित प्रकार घडला नाही. परंतु इजासन ,गोडगाव या गावातील शेतकऱ्यांची शेती ही जंगला लगत असल्याने, वाघाचे दर्शन शेतमजूरांना होत आहे त्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडण्यापुर्वी, वनविभागाने तात्काळ वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरीक करीत आहे.

Copyright ©