यवतमाळ राजकीय

भारतीय जनता व्यापारी आघाडी संघटनेच्यावतीने विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत

वणी तालुका प्रतिनिधी :- निलेश अ.चौधरी

भारतीय जनता व्यापारी आघाडी संघटनेच्यावतीने विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत

महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे वणीच्या लौकीकामध्ये मानाचा तुरा रोवणारे, शिवाजी उद्यानाच्या उद्घाटन समारंभ कार्यक्रम प्रसंगी भारतीय जनता व्यापारी आघाडी संघटनेच्यावतीने, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी मंचावर मा. केंद्रीय मंत्री हंसराज अहिर,वणी विधानसभेचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, शहराचे प्रथम नागरिक तारेंद्रजी बोर्डे व मान्यवर उपस्थित होते. यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष लवलेश लाला ,उपाध्यक्ष रवी रेभे ,सरचिटणीस संदीप मदान, सुधीर साळी, नितीन बिहारी, राहुल वैद्य व मोठ्या संख्येने व्यापारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Copyright ©