यवतमाळ सामाजिक

निराश्रितांच्या आश्रय बणून धावून येणारे भाई अमन ठरतायत देवदूत..!

जिल्हा प्रतिनिधी

निराश्रितांच्या आश्रय बणून धावून येणारे भाई अमन ठरतायत देवदूत..!
———————————————-
आत्महत्याग्रस्त कुटुंबाला भाई अमन वेल्फेअर असोसिएशनचे आर्थिक मदत 
——————–
माह्यावाल कुणी नसताना देव भेटला आमाले
शांताबाईंनी अमन भाईच्या पायावर डोकं ठेऊन फोडला हंबरडा !

यवतमाळ- तालुक्यातील हिवरी पासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या वाटखेड येथिल रहिवासी दत्ता वाघमारे हे रोजमजुरी करून आपल्या संसाराचा गाडा चालवीत होते. मात्र मागील काही दिवसांपासून रोजगार मिळणे दुरापास्त झाले. त्यामुळे आपले कुटुंबाची गुजराण करण्यास त्यांना मोठा संघर्ष करावा लागू लागला. अश्यातच त्यांनी टोकाची भूमिका घेत आपल्या घरातील अठराविश्व गरिबीला कंटाळून आपल्या राहत्या घरीच आत्महत्या केली. त्यामुळे घरातील कर्ता प्रमुख व्ययक्तीने हा निर्णय घेवून आपली जिवनयात्रा संपविल्याने त्याचे कुटुंब अचानक उघड्यावर पडले. त्याच्या पश्चात मानसिक रित्या खचलेल्या पत्नी शांता वाघमारे मुलगा राजेंद्र व अजय हे असून घरातील कर्ता पुरुष गेल्याने या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली. त्यांना धड दोन वेळचे जेवण सुध्दा मिळणे कठीण झाले आहे. या कुटुंबाची परिस्थिती पहावल्या जात नव्हती त्यामुळे गावातीलच धिरज शेरकर यांनी भाई अमन यांना या गंभीर बाबीची कल्पना दिली. तो लगेच भाई अमन यांनी विनाविलंब वाटखेड गाठून या कुटुंबाची भेट घेऊन परिस्थिती हाताळली यात त्यांनी मायेचा पाझर मोकळे करून देत लगेच त्यांना एक मोठी रक्कम देवून एक महिना पुरेल अशी किराणा किट उपलब्ध करून दिली. व दोन वर्षापर्यंत सर्व प्रकारचे अन्न धान्य देण्याचे सांगितले. त्यामुळे प्रत्येकांच्या दुःखात सहभागी होवून मदतीला धावून जाणारे भाई अमन वाघमारे कुटुंबीयांचे देवदूत ठरले आहे. अशा वेळी माह्यावाल कुणी नसताना देव भेटला आमाले असे म्हणत
शांताबाईंनी अमन भाईच्या पायावर डोकं ठेऊन फोडला हंबरडा !पुर्णतः दुःखात सापडलेल्या या कुटुंबियांच्या मदतीला धावून येवून जो मदतीचा धीर देण्यात आला त्यामुळे वाघमारे कुटुंबीय भारावून गेले आहे. दर महिन्याला दोन वर्षापर्यंत भाई अमन वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने किराणा किट देण्यात येणार असल्याने त्यांनी या महान दात्यांचे मनोमन आभार मानले.
जिल्ह्यात सर्वदूर परिचित असलेले भाई अमन हे सदैव गरजवंताच्या मदतीला धावून जातात. त्यांचे कार्य ही सामाजिक दायित्व जोपासून अविस्मरणीय ठरत आहे. कोरोना काळात रुग्णालयातील विलगिकरण लक्षात उपचार घेणाऱ्या रुग्णांना अविरत भोजन पुरविले. दानशूर व्यक्तिमत्वाचे भाई अमन यांनी लॉक डाऊन काळात एक मदतीचा हात म्हणून किराणा व धान्य किट, मास्क, सैनीटाझर, रुग्णांना औषधी, फळ ड्रायफुड चे वितरण केले तर रुग्णांच्या नातेवाईकांना सुध्दा भोजन देण्याचे काम त्यांच्या कडून करण्यात आले. भाई अमन केवळ वाघमारे कुटुंबीयांनाच नव्हे तर गोर गरीब जनतेच्या मदतीसाठी ते अविरत कार्य करीत असल्याने ते गोरगरिबांचे देवदूत ठरत आहे. वाटखेड येथिल वाघमारे कुटुंबीयांची यातना जाणून घेण्यासाठी गेले असता यावेळी गणेश नाईक, दिनेश पाटील, ओंकार चेके, प्रेमराज धूर्वे सरपंच नाका पार्डी,शुभम जैस्वालअशोक मेटकर, संजय मुरमुरे, वाटखेडचे धीरज शेरकर, शेख नाझिम, फिरोज पठाण, दिंगाबरअवथळे, आदी मान्यवर उपस्थित राहून या कुटुंबीयांना धीर दिला

Copyright ©