यवतमाळ सामाजिक

लोकमान्य टिळक,महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी डॉक्टर प्रसाद खानझोडे यांची नियुक्ती

वणी तालुका प्रतिनिधी:- निलेश अ.चौधरी

लोकमान्य टिळक,महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी डॉक्टर प्रसाद खानझोडे यांची नियुक्ती

ब्राह्मण सभा शाखा वणी च्या वतिने प्रा. डाँ. प्रसाद खानझोडे यांची लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी नियुक्ती झाल्या बद्दल त्यांचा सत्कार व तसेच समाजातील माध्यमिक व ऊच्च माध्यमिक शालांत परीक्षेत प्राविण्य प्राप्त विधार्थांचा गुणगौरव करण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री. प्रकाश परांडे, श्री. सुभाष देशमुख यांच्या शुभहस्ते सत्कार व विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद पुंड हे प्रमुख अतिथी होते. विधार्थी ओंकार अणे, गौरांग सरमोकद्यम, अर्पीता पिपंळकर, यश व अनिरूद्ध कुळकर्णी हे गुणवत्ता प्राप्त विधार्थी, यांचा गुणगौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे
प्रास्ताविक राजाभाऊ पाथ्रडकर अध्यक्ष ब्राह्मण सभा, संचालन अँड. प्रविण पाठक, आभार चंद्रशेखर खोंड
कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता अरूण कावडकर , जयंत लिडबिडे, निखील साठे, मिलींद आमलेकर यानी परीश्रम घेतले.

Copyright ©