यवतमाळ सामाजिक

विद्यार्थी तरुणीची छेडछाड केल्याप्रकरणी माहूर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल.

माहूर प्रतिनिधी पदमा गि-हे

विद्यार्थी तरुणीची छेडछाड केल्याप्रकरणी माहूर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल.

महिलांची छेड काढणार्‍यांची गय केली जाणार नाही. पोलीस निरीक्षक नामदेव रीठे.

तालुक्यातील केरोळी येथील रहिवासी असलेला विवाहीत पुरूष शिवाजी आठवले याने श्रीरेणूका महाविद्यालयात बी, ए. हे शिक्षण घेत असलेल्या धनोडा येथील विद्यार्थनीचा माझ्याशी लग्न करण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून पाठलाग करीत होता, परंतू सादर तरुणीने त्याचेसोबत लग्न करण्यास तयार होत नसल्याचा राग मनात धरून सदर तरूणी दिनांक 30 सप्टेंबर 2021रोजी दुपारी 2वाजता बी. ए. त्रुतिय वर्षाचा फॉर्म भरण्यासाठी महाविद्यालयात आली असता फॉर्म भरल्यानंतर महाविद्यालयासमोर गावी जाण्यासाठी अॅटोची वाट पाहत असताना आरोपी शिवाजी आठवले हा आपला अॅटो घेउन तिच्या समोर आला व माझेशी लग्न करून माझे सोबत घरी चल असे म्हणत तिचे केस व मानेला धरून तिला ऑटोवर ढकलून तिच्या पाठीवर बूक्यांनी मारहाण केली असून तिच्या ओठाला जबर मार लागला सदर तरुणीने आरोपीच्या तावडीतून कशीबशी सुटका करून पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली तिच्या तक्रारीवरून पोलीसांनी आरोपी विरोधात गू. र. नं. 121/2021 कलम 354,354(ड),323,504,506 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीस महागाव येथून अटक करून न्यायालयात हजर केले असता आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली,याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नामदेव रीठे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासिक अमलदार स. पो. नीएस. डी. पवार. साहेबराव सगरोळीकर, हे करीत असून महिलांची छेड काढणाऱ्यांची गय केली जाणार नाही असे पोलीस निरीक्षक नामदेव रीठे यांनी सांगितले .

Copyright ©