यवतमाळ सामाजिक

आझादी का अमृत महोत्सव उपक्रमांतर्गत लोक कलावंत भीमराव वाघमोडे सन्मानित

जिल्हा प्रतिनिधी

आझादी का अमृत महोत्सव उपक्रमांतर्गत लोक कलावंत भीमराव वाघमोडे सन्मानित

ग्रामपंचायत वरुड भक्त येथे आझादी का अमृत महोत्सव

संपूर्ण भारत देशांमध्ये आज आजादी का अमृत महोत्सव हा कार्यक्रम साजरा केला जात असतांनाच राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंतीचे निमित्त साधून या उपक्रमाचे आयोजन करून यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी पंचायत समिती मधील वरुड फक्त या ग्रामपंचायतीने आयता येथील लोककलावंत श्री भीमरावजी वाघमोडे यांचा शाल श्रीफळ व सन्मानपत्र देऊन सत्कार केला.भिमरावजी वाघमारे हे गेल्या कित्येक दशकांपासून सामाजिक जनजागृतीचे काम करीत आहेत. ते आजवर स्वच्छता, अंधश्रद्धा, शेतकरी आत्महत्या, मानवी जीवन, श्रम साफल्य, कोरोना आदी विषयांवर आपल्या भजन व कीर्तनाच्या माध्यमातून सर्वांगीण विषयावरती समाज प्रबोधनाचे काम करत आले असून ते एक आज लोक कलावंत म्हणून प्रख्यात आहेत त्यांच्या या कार्याची दखल व ग्रामपंचायत वरुड भक्त येथे त्यांनी वेळोवेळी केलेले मार्गदर्शन, प्रबोधन लक्षात घेता आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांना ग्रामपंचायत वरुड भक्त द्वारा शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायतीचे प्रभारी सरपंच अरविंद चव्हाण, ग्रामसेवक विजयकुमार ठेंगेकर, मुख्याध्यापक शालीकरावजी मुरखे, यांचेसह ग्रामपंचायत सदस्य सुरेश काळे, पंकज मुनेश्वर, सौ. निता काळे, सौ.मंजुषा खराबे, सौ.रंजना शिरगरे, सौ. मंदा भुरले, व प्रतिष्ठित नागरिक या कार्यक्रमास उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन ग्रामसेवक विजयकुमार ठेंगेकर यांनी तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक मुरखे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी नरेंद्र काळे व गणेश राठोड यांनी परिश्रम घेतले.

Copyright ©