यवतमाळ सामाजिक

सहकाराला संस्काराची जोड दिल्यास ग्राहकांचा विश्वास वाढेल-राजश्री पाटील

सहकाराला संस्काराची जोड दिल्यास ग्राहकांचा विश्वास वाढेल-राजश्री पाटील

राज्य फेडरेशनच्या वतीने राजश्री पाटलांचा गौरव

सहकार क्षेत्रातील सर्वच संस्थांनी आपल्या ग्राहकांना संस्थेविषयी सुरू असलेले कामकाज,व्यवहार,उपक्रम व आगामी संकल्प याबाबत वेळोवेळी तपशीलवार आणि सखोल मार्गदर्शन करावे. यातून सहकाराची बीजे पेरली जातील व पुढे संस्कार निर्माण होईल. यामुळे ग्राहकांच्या मनात आपल्या संस्थेबद्दल ठाम विश्वास निर्माण होऊन ते कायम आपल्या सोबत जोडले जातील असे मत गोदावरी अर्बनच्या अध्यक्ष राजश्री पाटील यांनी राज्य फेडरेशनच्या वतीने सहकार प्रशिक्षण संशोधन केंद्र,शिर्डी येथे आयोजित संचालक व व्यवस्थापक प्रशिक्षण शिबिरात व्यक्त केले.

महाराष्ट्र सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष ऍड.विद्याधरजी अनास्कर ( राज्य मंत्री दर्जा )व बुलढाणा अर्बनचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांच्या शुभहस्ते राजश्री पाटील यांच्या कार्याचा गौरव करीत सन्मान करण्यात आला.यावेळी फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे,कार्याध्यक्ष राजुदास जाधव,उपकार्याध्यक्ष सुदर्शन भालेराव,महासचिव शांतीलाल शिंगी,खजिनदार दादाराव तुपकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेखा लवांडे उपस्थित होते.

पुढे बोलतांना राजश्री पाटील म्हणाल्या की,आपल्या शाखेतील प्रत्येक कर्माचारी हा संस्थेचा आरसा असतो. तो ज्या पध्दतीने आपल्या संस्थेची माहिती आलेल्या ग्राहकांना देतो.त्यावरच संस्थेच्या कामकाजाची गुणवत्ता ठरत असते,त्यामुळे येणाऱ्या काळात प्रत्येक संस्थेने आपल्या शिपायां पासून ते व्यवस्थापका पर्यत सर्वांना आपल्या संस्थेच्या माध्यमातून सुरु असलेल्या
व्यवहार,कामकाज,आगामी संकल्प याविषयी प्रशिक्षित करणं गरजेचं आहे.जेणेकरून संस्थेच्या कामकाजाची संपूर्ण माहिती ग्राहकांना दिल्या जाईल.हे कार्य निरंतर केल्यास त्यातून सहकार संस्कार निर्माण होईल.राज्यातील सर्वच पतसंस्था ह्या गेल्या अनेक वर्षांपासून ज्या ठिकाणी बँक पोहचू शकत नाही अश्या दुर्गम व ग्रामीण भागात आपल्या सेवा देण्याचं काम अगदी नेटाने करीत आहेत.त्यासोबतच ज्यांची पत नाही त्यांची पत निर्माण करण्याचे कार्य देखिल पतसंस्थाच करू शकतात असा विश्वास देखील राजश्री पाटील यांनी व्यक्त केला.

या प्रशिक्षण शिबिरास गोदावरी अर्बनचे उपाध्यक्ष हेमलता देसले,व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर सचिव ऍड.रवींद्र रगटे,संचालक प्रा. सुरेश कटकमावर,प्रसाद महल्ले मुख्य व्यवस्थापक सुरेखा दवे यांच्यासह शाखा व्यवस्थापक व अधिकारी उपस्थित होते.

Copyright ©