यवतमाळ सामाजिक

ग्राम रोजगार संघाच्या उपोषणाला वंचितच्या पदाधिकाऱ्यांची भेट

वणी तालुका प्रतिनिधी:- निलेश चौधरी

ग्राम रोजगार संघाच्या उपोषणाला वंचितच्या पदाधिकाऱ्यांची भेट

येथील तहसील कार्यालयाचे समोर आज ता. २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती निमित्य ग्राम रोजगार संघटनेचे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण सुरू असून या रोजगाराच्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी भेट दिली व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
ग्राम रोजगार संघर्ष समितीच्या वतीने ग्राम रोजगार सेवकांना शासकीय मानधनावर नियुक्ती देण्यात यावी या मागणीसह त्यांच्या प्रवास भत्ता देण्यात यावा यासाठी वणी तालुक्यातील सर्व ग्राम रोजगार सेवकांनी आज सकाळी ११ वाजता पासून लाक्षणिक उपोषणाला सुरवात केली होती. या आंदोलन मंडपात वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष दिलीप भोयर,जिल्हाउपाध्यक्ष मंगल तेलंग, शहराध्यक्ष किशोर मुन यांनी प्रत्यक्ष जाऊन सर्व आंदोलनकर्त्यांची भेट घेतली व त्यांच्या सर्व समस्या ऐकून घेतल्या व स्थानक पातळीवरील समस्यांच्या लवकरच पाठपुरावा करून संबंधित अधिकारी यांची भेट घेऊन तात्काळ निकाली लावण्यासाठी प्रयत्न करणार व राज्य पातळीवरील समस्यांचा देखील सरकारकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. यावेळी उपस्थित सर्व रोजगारांनी आनंद व्यक्त केला.

Copyright ©