यवतमाळ सामाजिक

सुसंस्कार विद्या मंदिर येथे गांधी व शास्त्री जयंती निमित्य चित्र प्रदर्शनी

जिल्हा प्रतिनिधी

सुसंस्कार विद्या मंदिर येथे गांधी व शास्त्री जयंती निमित्य चित्र प्रदर्शनी

सुसंस्कार विद्यामंदिर येथे गांधीजी यांची 152 वी व लालबहादूर शास्त्रीजी यांची 116 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शाळेचे सचिव श्री. के. संजय सर व प्रमुख पाहुण्या म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. उषा कोचे मॅम उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व वंदन करून करण्यात आली. कोरोना प्रादुर्भावामुळे ऑनलाइन स्वरूपात आयोजित हा कार्यक्रम पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक या तीन विभागात घेण्यात आला. या कार्यक्रमात गांधीजी व शास्त्रीजी या दोन्ही महान व्यक्तिमत्त्वाबद्दलचा आदर विद्यार्थ्यांनी भाषणे, काव्यवाचन या द्वारे प्रगट केला. याप्रसंगी वर्ग ६वीच्या ब्राह्मी जवळकर, कृष्णा भोयर, आद्या पुंडशास्त्री, सार्थक कुर्लेपवार , वेदांत डिवरे व प्रियांशु कोचे यांनी व्यक्तिगत व सामूहिक नाटिका सादर केल्या. या कार्यक्रमाचे औचित्य साधुन ‘गांधीजी व शास्त्रीजी व्यक्तीचित्र स्पर्धा’ या स्पर्धेचे आयोजन माध्यमिक विभागातर्फे करण्यात आले. त्या नंतर ह्या चित्रांचे प्रदर्शन पालकांकरिता लावण्यात आले,ह्या प्रदर्शनीचे उद्घाटन सचिव के संजय सर व मुख्याध्यापीका सौ.उषा कोचे ह्यांचे हस्ते करण्यात आले, या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग दिला या स्पर्धेत वर्ग ६च्या देवर्षी तिजारे, यशस्वी पवार, ब्राह्मी जवळकर ,वर्ग ७ वीच्या सिद्धी वडस्कर, रिद्धी गाडवे, आँचल रेगुंडावार, वर्ग ८वीच्या श्रावणी चंद्रे, सार्थक निकम, सोहम निकम, वर्ग ९वीच्या खुशी गुगलिया, वर्ग १०वीच्या इशा दहिवलकर, तनिष्का ब्राह्मणवाडे यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केला तसेच वल्लभ कडू याला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. के. संजय सर व प्रमुख पाहुण्या व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. उषा कोचे मॅम यांनी आपल्या मार्गदर्शनात गांधीजी व शास्त्रीजी यांच्या गुणांचा विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात कसा अंगीकार करावा हे त्यांच्या जीवनातील विविध प्रसंगाद्वारे पटवून दिले. तसेच सर्व स्पर्धक व सहभागी विद्यार्थ्यांचे त्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणीबद्दल कौतुक केले. या कार्यक्रमाला शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

Copyright ©