यवतमाळ सामाजिक

करंजी ग्रामीण रुगलायलायात 102 रुग्णवाहिका जनतेच्या सेवेत दाखल 

करंजी प्रतिनिधी सागर मुडे

करंजी ग्रामीण रुगलायलायात 102 रुग्णवाहिका जनतेच्या सेवेत दाखल 

(अखेर ग्रामीण जनतेच्या मागणी यश मिळाले)

महाराष्ट्र शासना च्या उपक्रमा अंतर्गत  रुग्णवाहिका ग्रामीण भागातील जनतेच्या आरोग्य विषयक योजना अंतर्गत अदिवासी ग्रामीण भागातील महामार्गा वरील ग्रामीण रुग्णालया करीता रुग्णवाहिकेची मागणी मागील अनेक वर्षा पासून ग्रामीण जनतेकडून निवेदना द्वारे पालकमंत्री जिल्हाधिकारी यांच्या कडे वारंवार रुग्णवाहिकेची मागणी होत होती या विषयावर प्रसार माध्यमातून सतत पाठपुरावा केला जात होता अखेर रुग्णवाहिकेची मागणी पूर्णत्वास आली ग्रामीण भागातुन जिल्हा स्तरावर रुग्णांना उपचराकरिता मोफत सेवा उपलब्ध झाल्या बद्दल शासन स्तरावर जिल्हाधिकारी, पालकमंत्री , आमदार यांचे जनतेकडून आभार व्यक्त करण्यात येत आहे रुगवाहिकेच्या मागणी करीता विशेष प्रयत्न दैनिक प्रतिनिधी विलास होलगीलवार सागर मुडे राजू आगरकर सुनील वनकर अमोल कांबळे धनराज दहीगुडे सर्व प्रतिनिधीनी प्रसार माध्यमातून वारंवार बातमी प्रकाशित करीत होते सोबतच गावातील प्रतिष्ठित नागरिक आनंद साठे संजय कुंडलवार तिरूपती कंदकुरिवार संजय आंबटकर सुंदरदास कांबळे सर प्रफुल्ल नगराळे नागसेन भगत नारायण वासेकर अतुल चोपडा किशोर आडे तसेच अनेक गावकरी मंडळीनी आमदार खासदार याना सुद्धा अनेक वेळा निवेदना द्वारे रुग्णवाहिकेचे मागणी करीत होते अखेर करंजी व परिसरातील सामान्य जनतेची मागणी रुग्णवाहिका 102 च्या रूपाने दिलासा मिळाला
करंजी ग्रामीण रुग्णालयात 102 रुग्नवाहिका दाखल होताच ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ, मंगेश दुर्गे व सर्वं डॉक्टर यांचे हस्ते विधिवत पूजन करण्यात आले सर्व कर्मच्यारी उपस्थित होते,

Copyright ©