Breaking News यवतमाळ सामाजिक

गेल्या 24 तासात दोन पॉझिटिव्ह

जिल्हा प्रतिनिधी

गेल्या 24 तासात दोन पॉझिटिव्ह

 

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2165 बेड उपलब्ध

यवतमाळ दि. 30 सप्टेंबर : गेल्या 24 तासात जिल्ह्यात दोन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहे तर कोणीही कोरोनामुक्त झाले नाही. सध्या ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात पाच व बाहेर जिल्ह्यात पाच अशी एकूण दहा आहे.

जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 913 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी दोन अहवाल पॉझिटिव्ह असल्याने उर्वरित 911 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72884 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 71087 आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1787 मृत्यूची नोंद आहे.

आज पॉझिटीव्ह आलेले दोन रूग्ण इतर शहरातील असून त्यात एक पुरूष व एका महिलेचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यत सात लक्ष 43 हजार 986 चाचण्या झाल्या असून त्यापैकी सहा लक्ष 71 हजार 94 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 9.80 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी 0.22 आहे तर मृत्यूदर 2.45 आहे.

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2165 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 16 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2174 आहे. यापैकी 9 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 2165 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 787 बेडपैकी 9 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 778 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 755 बेडपैकी पुर्ण 755 बेड शिल्लक आणि 16 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 632 बेडपैकी पुर्ण 632 बेड शिल्लक आहेत.

______________________________________

शेतकऱ्यांनो, खचून जाऊ नका शासन तुमच्या पाठीशी’

अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचा दिलासा

 

& उमरखेड, महागाव, आर्णी व यवतमाळ तालुक्यात पाहणी व शेतकऱ्यांशी संवाद

& पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांनी सर्वप्रथम तक्रार नोंदवण्याचे आवाहन

& नुकसानग्रस्त भागाचे तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश

& उमरखेड तालुक्यातील बस दुर्घटनास्थळाची पाहणी

& पीकविमासाठी सर्व तहसिलदार व कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना मदत करावी

& महसूल, कृषी व जि.प.द्वारे पिक कापणी प्रयोग पुर्ण करण्याचे निर्देश

 

यवतमाळ दि. 30 सप्टेंबर : जिल्ह्यात संततधार पाऊस, अतिवृष्टी व पूर परिस्थतीमुळे ज्या-ज्या भागात नुकसान झाले आहे, त्या प्रत्येक ठिकाणचे पंचनामे तात्काळ करण्यात यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज उमरखेड, महागाव, आर्णी व यवतमाळ तालुक्यात अतिवृष्टी व पुरामुळे बाधीत भागाची पाहणी दौऱ्याप्रसंगी दिले तसेच नुकसानग्रस्त शेत शिवारात भेट देवून शेतकऱ्यांशी संवाद साधला व ‘शेतकऱ्यांना, खचून जाऊ नका, शासन तुमच्या पाठीशी आहे’ असा दिलासाही दिला.

जिल्ह्यात साडेतीन लाखावर शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा नोंदविला आहे, यापैकी ज्यांचे नुकसान झाले आहे त्या जास्तीत शेतकऱ्यांनी सर्वप्रथम आपली तक्रार नोंदवावी असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळण्यासाठी पीक विमा कंपनीकडे 72 तासाचे आत तक्रार दाखल व्हावी यासाठी महसुल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी मिशन मोडवर काम करून संबंधीत शेतकऱ्यांना तक्रार दाखल करण्यास मदत करावी, कोणाचाही अर्ज किरकोळ कारणासाठी परत करण्यात येऊ नये. विमा संदर्भातील सर्व अर्ज कृषी विभागाच्या सौजन्याने पीक विमा कंपन्यांनी ऑफलाईन स्वरूपात घ्यावे व जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक विमाचा लाभ भेटेल या अनुषंगाने प्रशासकीय यंत्रणा व पिक विमा कंपनीने कार्यवाही करावी असे आदेश जिल्हाधिकारी येडगे यांनी दिले.

जिल्हाधिकारी अमोल येडगे आज सकाळी सात वाजताच उमरखेड येथे दाखल झाले. सर्वप्रथम त्यांनी दहागाव नाल्यावरील पुलाची पाहणी केली दोन दिवसांपूर्वी या ठिकाणी एका दुर्घटनेत नांदेड-नागपूर बस वाहून चार जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांनी पैनगंगा नदीच्या मारलेगाव पुलावर जाऊन पूर परिस्थितीची पाहणी केली. तसेच पुराचा वेढा पडलेल्या संगम चिंचोली या गावाची भेट दिली. उमरखेड येथून जिल्हाधिकारी येडगे यांनी महागाव, आर्णी व यवतमाळ तालुक्यातील गावात भेट दिली. यवतमाळ तालुक्यातील मंगरूळ, रामनगर तांडा, माळुंगी व खरोला येथे भेट देवून शेत नुकसानीची पाहणी केली सर्व ठिकाणी शेतकऱ्यांशी संवाद साधला.

महसूल, कृषी व जील्हा परिषद यंत्रणेद्वारे प्रक्षेत्रावर जावून वस्तुनिष्ठ पिक कापणी प्रयोग पुर्ण करण्याचे व ऑनलाईन नोंदीद्वारे त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी येडगे यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे सर्व तहसिलदार व कृषी अधिकारी यांना दिल्या. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत आतापर्यंत 44 हजार 590 तक्रार अर्जानुसार प्राप्त झाले असून पुढील दोन-तीन दिवसात मोठ्या प्रमाणात पिक नुसानीचे तक्रार अर्ज प्राप्त होतील, त्यामुळे विमा कंपनीने देखील आपल्या प्रतिनिधींची संख्या वाढवून पुढील तीन ते चार दिवसात सर्वेक्षण पुर्ण करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी येडगे यांनी दिल्या. जे विमा प्रतिनिधी कामात हयगय करतील त्यांचेवर कारवाई प्रस्तावीत करण्याबाबतही त्यांनी निर्देश दिले.

याप्रसंगी उपविभागीय अधिकारी अनिरूद्ध बक्षी, तहसिलदार आनंद देवूळगावकर(उमरखेड), विश्वांभर राणे (महागाव), परसराम भोसले (आर्णी), कुनाल झाल्टे (यवतमाळ), संबंधीत तलाठी, ग्रामसेवक, कृषी अधिकारी व आरोग्य अधिकारी, विमा कंपनीचे अधिकारी तसेच दूरदृष्य प्रणालीवर जिल्ह्यातील सर्व तहसिलदार, कृषी अधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर प्रामुख्याने उपस्थित होते.
________________________________________

 

बॉईज स्पोर्ट कंपनी पुणे येथे प्रवेशाकरिता क्रीडा नैपुण्य चाचणी

8 ऑक्टोबरला जिल्हा क्रीडा संकुल येथे निवड चाचणी

यवतमाळ दि. 30 सप्टेंबर : आंतरराष्ट्रीय व ऑलंम्पीक दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी राज्यातील प्रतिभावान खेळाडूंची निवड करुन त्यांना शास्त्रोक्त प्रशिक्षण, संतुलीत आहार व अदयावत क्रीडा सुविधा पुरविण्याकरीता तसेच क्रीडा क्षेत्रात खेळाडूंनी दर्जेदार कामगीरी करण्यासाठी लहान वयात मुलांना क्रीडा विषयक प्रशिक्षक देणे आवश्यक असल्याने क्रीडा व युवक सेवा संचालनालय व आर्मी स्पोटर्स इंस्टीटयुट यांचे संयुक्त विद्यमाने बाईज स्पोर्ट कंपनी पुणे येथील प्रवेशा करीता क्रीडा नैपुण्याचा चाचण्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये डायव्हिंग, ॲथलेटीक्स, बॉक्सींग, कुस्ती, तलवारबाजी,वेटलिफटींग हे खेळ समाविष्ट आहेत. या मध्ये ८ ते १४ वर्षाखालील मुलांना चाचणी देता येणार आहे.

निवड चचणी कार्यक्रमानुसार डायव्हिंग, ॲथलेटीक्स, बॉक्सींग, कुस्ती, तलवारबाजी, वेटलिफ्टींग या खेळप्रकारासाठी विहित वयोगटातील मुलांनी दि. 8 ऑक्टोंबर 2021 रोजी स. 9 वाजता जिल्हा क्रीडा संकुल, यवतमाळ, नेहरु स्टेडीयम, गोधणी रोड, यवतमाळ येथे उपस्थित राहावे. अधिक माहिती करीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रकांत उप्पलवार यांनी केले आहे.

______________________________________

2 ऑक्टोबर रोजी ‘फ्रीडम रन’ मध्ये युवकांनी सक्रीय सहभाग नोंदवावा

– जिल्हाधिकारी

यवतमाळ दि. 30 सप्टेंबर : सुदृढ व निरोगी आरोग्यासाठी तसेच दररोज व्यायामाची सवय लागावी यासाठी जिल्ह्यातील 18 ते 29 वयोगटातील युवकांनी स्वातंत्र्याच्या अमृत महात्सवानिमित्त आयोजित फ्रीडम रन मध्ये सक्रीय सहभाग घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.

दिनांक 2 ऑक्टोबर 2021 रोजी प्रयासवन, गोधणी रोड, यवतमाळ येथे नेहरू युवा केद्रातर्फे फ्रीडम रन चे आयोजन करण्यात आले आहे. या रन चे सकाळी 6 वाजता जिल्हाधिकारी अमोल येडगे हिरवी झेंडी दाखवून सुरवात करतील. सदर रन मध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त युवकांना याच ठिकाणी सकाळी 8 वाजता पालकमंत्री सुदिपान भुमरे यांच्या हस्ते प्रमाणपत्र व मेडल देवून सन्मानित करण्यात येणार असल्याचे जिल्हा युवा अधिकारी सारंग मेश्राम यांनी कळविले आहे.

Copyright ©