यवतमाळ सामाजिक

संपूर्ण विदर्भाची नापिकीची ढगफुटीची स्थिती मराठवाड्यासारखीच

 

संपूर्ण विदर्भाची नापिकीची ढगफुटीची स्थिती मराठवाड्यासारखीच

किशोर तिवारी यांनी मुख्यमत्र्यांकडे मांडली अभुतपुर्व अस्मानी व सुलतानी संकटाची भयानक परिस्थिती

दिनाक- ३० सप्टेंबर २०२१
विदर्भातील वर्धा अमरवती अकोला वाशीम यवमाळ व चंद्रपूर जिल्हात भेट देऊन ढग फुटी व अख्ख्या सोयाबीन नासाडी पाहल्यानातर दिलेल्या अहवालात म्हटले आहे की विदर्भाचे संकट मराठवाड्यातील संकटाप्रमानेच भीषण असुन शेतकऱ्यांचे सोयाबीन व धानाचे पीक पूर्णपणे बुडाले आहे व कापसाची बोंडे पार सडली असुन विदर्भातले शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान कमीतकमी वीस हजार कोटींच्या घरात असुन आता पंचनामे न करता सरसकट मदत देने काळाजी गरज आहे असे कै वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन चे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे मागणी केली आहे.
पिकविमा कंपन्या नदाराद
——–
सद्या कृषी विभाग अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या तुटवळा असल्याने वाऱ्यावर आहे व पीकविमा अधिकारी उपलब्ध नसुन टोल फ्री क्रमांक बंदच येत असल्याच्या प्रचंड तक्रारी आहेत अशा लाचार परिस्थितीमध्ये विदर्भात प्रचंड प्रमाणात नैऱ्याशात आहेत. आपण कालच मराठवाडयातील शेतकऱ्यांना धीर धरन्याच्या सल्ला दिला मात्र प्रचंड प्रमाणात ढगफुटी पुर व नापीकी झालेल्या विदर्भात अधिकाऱ्यांनी वातानुकूल ऑफीस मध्ये बसुन विदर्भात सर्व नियंत्रणात असुन नापीकी व नुकसान झाले नाही असे अहवाल दिल्याच्या भीतीने शेतकऱ्यांनी मला माझ्या दौऱ्यात विचारना केल्याने हा अहवाल सादर केल्याचा खुलासा किशोर तिवारी यांनी यावेळी केला आहे.
मागील वर्षी सुद्धा प्रचंड प्रमाणात ढगफुटी व सोयाबीन नासाडी झाली मात्र पीक वीमा कंपन्यानी कृषी विभागाचे नासलेले अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन शेतकऱ्यांना मदतीपासुन वंचित ठेवले आहे यावर्षी कृषी विभागाचे अधिकारी झोपलेले वा झोपण्याचे सोंग घेवून आहे व कृषी व ग्रामीण भागातील समस्यांचे कवडीचा अभ्यास नसणारे अतिशय अनुभव नसणारे व डोक्याला IAS झाल्याच्या तोऱ्यात अख्खा विदर्भ प्रशासकिय नादारी काढल आहे हया सर्व अनुभव नसणारे अधिकारी विदर्भाचे संकट वाढवत असुन यांची हकालपट्टी काळाची गरज असल्याचे प्रतिपादन किशोर तिवारी यांनी यावेळी केले आहे

Copyright ©