यवतमाळ सामाजिक

माहूर नगर पंचायतीने निधीचे वाटप करून दिला अपंगाना सहारा.

प्रतिनिधी माहूर पदमा गि-हे

माहूर नगर पंचायतीने निधीचे वाटप करून दिला अपंगाना सहारा.

कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून शासनाने लागू केलेल्या ताळेबंदीमुळे अपंगाना झेपतील अशी कामे करता आली नाहीत.त्यामुळे त्यांचेवर उपासमारीची वेळ आल्याची बाब लक्षात घेवून नगर पंचायतीने शहरातील एकूण 92 अपंग लाभार्थ्यांची आर्थिक मदत केली आहे.
स्थानिक उत्पन्ना पोटी 5 टक्के निधी हा अपंग लाभार्थ्यांकरीता राखीव ठेवण्यात येतो.त्यानुसार नगर पंचायतीने प्रत्येकी 2400 रुपये प्रमाणे 63 अपंग लाभार्थ्यांचा 151200 रूपयाचा धनादेश महाराष्ट्र ग्रामीण बँकेत तर उर्वरीत 29 लाभार्थ्यांचा 69600 रुपयाचा धनादेश भारतीय स्टेट बँकेच्या स्थानिक शाखेत गुरुवार दि.30 सप्टें. जमा केल्याची माहीती कार्यालयीन अधीक्षक वैजनाथ स्वामी यांनी दिली.

Copyright ©