यवतमाळ सामाजिक

शेतीच्या नुकसानीचे जिल्हाधिकारी साहेबांचे महामार्गावरून पाहणी

शेतीच्या नुकसानीचे जिल्हाधिकारी साहेबांचे महामार्गावरून पाहणी
———————————————-
महामार्गावरून शेतकऱ्याचे वास्तव लक्षात येईल काय?
संतप्त शेतकऱ्यांचा सवाल
————————————————-
यवतमाळ- सततच्या अतिवृष्टीने शेतकरी बांधव पुर्णतः मेटाकुटीस आला असतानाच त्याच्या हातातोंडाशी आलेला पिक भुई सपाट झाला आहे. मुख्य पिक समजल्या जाणाऱ्या सोयाबीनला अंकुर फुटले आहे तर कपाशीचे बोंड सडत आहे. अश्या परिस्थितीत शेतकऱ्यांना वाली असणारे पालकमंत्री लुप्त झाले आहे. अखेर प्रशासनातील जिल्हाधिकारी साहेब हे व्यथा जाणून घेतील असे वाटले होते मात्र त्यांनीही जांब हिवरी परिसरातील शेतात मोका पाहणी ऐवजी महामार्गावरून च शेतीची पाहणी केली त्यामुळे शेतकऱ्यांच्या दुःखाचे वास्तव काय हे त्यांना काय समजणार याची खमंग चर्चा शेतकरी वर्गात केली जात आहे.
उमरखेड, पुसद, महागाव दौऱ्यावर गेलेले जिल्हाधिकारी साहेब मंगरूळ, भांब राजा, हिवरी मार्गाने येत असल्याचे माहीत होताच या परिसरातील जनतेच्या काही प्रमाणात आशा पल्लवित झाल्या होत्या. पालकमंत्री लुप्त असले तरी जिल्हाधिकारी साहेब येत आहे. ते आपले वास्तव व्यथा शासन दप्तरी पोहचवेल अशी अपेक्षा होती. मात्र जिल्हाधिकारी साहेबांनी उंटावरूनच शेळ्या हाकळल्याचा प्रत्यय या ठिकाणी अनुभवबायाला मिळाला ते शेतात जावून न खरे नुकसान कसे झाले आहे शेतकरी बांधव काय हालअपेष्टा भोगतो आहे यांची त्यांनी फुसटसी कल्पना घेतली नसल्याने भांब, हिवरी परिसरातील हतबल शेतकर्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.

Copyright ©