यवतमाळ सामाजिक

घाटंजी पं. स. कडून आवास प्लस “प्रपत्र -ड” कायम करण्यासाठी कार्यशाळा

कार्यकारी संपादक राजू चव्हाण

घाटंजी पं. स. कडून आवास प्लस “प्रपत्र -ड” कायम करण्यासाठी कार्यशाळा
_———————————————
घाटंजी -शासनाच्या धोरणानुसार घरकुल योजनेत एकही लाभार्थी वंचित राहू नये असे उद्दिष्ट होते. मात्र मागील सर्वे नुसार बहुसंख्य लाभार्थी प्रपत्र ब मध्ये आले नाही. आणि ते घरकुल लाभापासून वंचित राहण्याची वेळ आली. यावर अनेक तक्रारी प्राप्त झाल्याने ज्यांचे नाव सुटले आश्यांची परत नावे घेण्यात येवून त्यांना प्रपत्र ड मध्ये समाविष्ट करण्यात आले. याच आवास प्लस (प्रपत्र ड) कायम स्वरुपी यादी बनविणे बाबतची कार्यशाळा दिनांक २९ सप्टेंबर रोजी आमदार डॉ संदीप धुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
प्रपत्र ड मधील घरकुल लाभार्थी निवड करून ते कायम करण्याच्या कामात पारदर्शकता असावी. लाभार्थ्यांचे निकष काय असेल यावर सबंधित विभागाकडून मार्गदर्शन करण्यात आले. ही प्रतीक्षा यादी कायम करण्याचे काम युद्ध पातळीवर करून सादर करण्याचेही यावेळी सांगण्यात आले. यावेळी डी. आर. डी. ए. यवतमाळ चे ठमके साहेब, घाटंजी पंचायत समितीच्या सभापती निताताई आकाश जाधव, उपसभापती सुहास देशमुख पारवेकर, पंचायत समिती सदस्य अभिषेक ठाकरे, गटविकास अधिकारी सोनाली माडकर, माजी सभापती रुपेश कल्यमवार, मोहन जाधव, आकाश जाधव, रणधीर आत्राम, जिवन मुद्दलवार व जि. प. आणि प. स. सदस्य यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यशाळेत तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक यांनी सहभाग नोंदवून कार्यशाळेचा लाभ घेतला. या कार्यशाळेचे सूत्रसंचालन दहापुते यांनी केले तर यशस्वीतेसाठी निलेश मानगावकर, विशाल मडगुलवार, निखिल चौधरी, गौरव टाकले, अशोक कनाके यांनी अथक परिश्रम घेतले.

Copyright ©