यवतमाळ सामाजिक

मुंगोली गावच्या पुनर्वसनाला संबंधीत प्रशासनाचा खोडा

वणी तालुका प्रतिनिधी निलेश चौधरी

मुंगोली गावच्या पुनर्वसनाला संबंधीत प्रशासनाचा खोडा
…………………………………………..
एक महिण्यात पुनर्वसन न केल्यास गावकऱ्यांचा उपोषनाचा इशारा
——————————————-
वणी कोळसा खान क्षेत्रात गेलेल्या वणी तालूक्यातील मुंगोली गावचे पुनर्वसन गेल्या चार वर्षांपासून संबंधित प्रशासनाच्या दिरंगाईने रखडून असल्याने येत्या २७ आक्टोबर पर्यंत पुनर्वसनाचा मुल्यांकन प्रस्ताव वेकोली प्रशासनाला सादर न केल्यास मुंगोली ग्रामस्थ आमरण उपोषण करण्याचा गंभीर इशारा दिला आहे.
मुंगोली गावच्या पुनर्वसनाचा मुद्द्यावर मुंगोली ग्रामपंचायतचे उपसरपंच रूपेश ठाकरे यांनी ज़िल्हाधीकारी साहेब यवतमाळ पासुन ते सार्वजनिक बांधकाम उपविभाग वणी यांच्या प्रयंत अनेक वेळा पत्र व्यवहार केला ,प्रत्यक्ष भेंट घेतली तरी सुध्दा मुजोर बांधकाम विभागाला मुंगोलीच्या पुनर्वसनाच काही सोयरसुतक नाही ,पुनर्वसनासाठी वेक़ोली प्रशासनाने ६६/१ ,६६/२ ,६६/३ व६७ असी एकुण ५.१८ हेक्टर जमीन खरीदी केली ,त्या ठिकाणी पुनर्वसन करण्यासाठी फ़क्त सार्वजनिक बांधकाम ऊपविभाग वणी यांच्या चालढकल भुमिकने गेल्या चार वर्षांपासून मुंगोली वासी पुनर्वसनापासुन वंचित आहे, खान परीसरात असलेल्या प्रदुषणामुळे अनेकांना विविध आजाराने ग्रासले असल्याचे वास्तव असताना एसी आणि डिसीत बसुन पुनर्वसन ग्रस्ताची अवहेलना करत आहे, क्षेत्रिय महाप्रबंधक वणी क्षेत्र उर्जाग्राम ताडाळी जिल्हा चंद्रपूर यांनी पत्र क्रमांक २६३१ / दि. ०८/०७ २०१७ ला मा कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पांढरकवडा यांना वेकोली वणी क्षेत्राच्या मुंगोली निर्गुडा एक्सटेशन डिप ओपन कास्ट परियोजने साठी अधिग्रहित करण्यात येणाऱ्या जमिनीवर विहीरी ,घरे,बोरवेल व इतर बांधकाम करण्याचे मुल्यांकन करण्यासाठी पत्र दिले होते ,परंतु चार वर्षांपासून कुठलेही मुल्यांकन न करता केवळ पत्रव्यवहाराचा खेळ खेळत मुंगोली वासीयांचा भ्रमनिरास केला, येणाऱ्या २७ आक्टोबर पर्यंत मुल्यांकन न केल्यास आमरण उपोषन करण्याचा इशारा मुंगोली गावचे उपसरपंच ॲड.रुपेश ठाकरे यांनी गावकऱ्याच्या वतीने प्रशासनाला निवेदनाद्वारे दिला आहे.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©