यवतमाळ सामाजिक

विदर्भ नदीवरील पुलाला कठडे व पुलावरील रस्ता दुरुस्तीची मागणी

वणी तालुका प्रतिनिधी निलेश चौधरी

विदर्भ नदीवरील पुलाला कठडे व पुलावरील रस्ता दुरुस्तीची मागणी

तालुक्याती पुरड व नेरड येथील विदर्भ नदीच्या पुलाला कठडे नसल्यामुळे, त्यावरुन पडून मागील वर्षी दोन बैल मृत्युमुखी पडले होते. पुरड येथील विद्यार्थी नेरडला शाळेत जातांना पुलावरूनच ये-जा करीत असतात, त्यामुळे अनुचित प्रकार घडण्याची शक्यता बळावली आहे.पुलावरील रस्ता उखडल्यामुळे ,तिथे मोठ-मोठे खड्डे पडले आहे.त्यामुळे वाहनधारकांना पुलावरून जाताना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे ह्या समस्येचे गांभीर्य लक्षात घेता, पुरड येथील सरपंच सौ सीमा विशाल आवारी यांनी उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग यांना विदर्भ नदीवरील पुलाला कठडे व रस्ता दुरुस्तीसाठी निवेदन दिले. यावेळी नेरड येथील सरपंच सौ.सुवर्णा जुनगरीसह गावकरी मोठ्या संख्येने हजर होते.

Copyright ©