यवतमाळ राजकीय

शहरातील समस्या त्वरित निकाली काढा मनसे ची मागणी

जिल्हा प्रतिनिधी

शहरातील समस्या त्वरित निकाली काढा मनसे ची मागणी

यवतमाळ शहरातील रस्त्याला पडलेल्या खड्ड्यांच्या विषयावर तसेच शहरातील वाढती रोगराई त्या अनुषंगाने शहरातील दाट वस्त्या झोपडपट्टी भागात तात्काळ औषध फवारणी करावी आणि शहरातील मोकाट कुत्रे गुरेढोरे यांचा तात्काळ बंदोबस्त करावा या मागणीसाठी मनसे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार व मनविसेचे जिल्हाध्यक्ष अनिल हमदापुरे यांच्या नेतृत्वात आज नगर पालिकेच्या मुख्याधिकारी मडावी यांना निवेदन देण्यात आले . शहरात नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार असून संपूर्ण यवतमाळकर जनता रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे त्रस्त आहे रोज रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे छोटे-मोठे अपघात घडत आहेत तसेच अनेक ठिकाणी कुत्र्यांनी लहान मुलांना चावा घेण्याच्या घटना घडल्या आहेत सोबतच शहरात डेंग्यू मलेरिया टायफाईड यासारख्या रोगांनी थैमान घातले आहे या सर्व गंभीर विषयांवर नगरपालिका प्रशासन ढिम्म असून येत्या आठ दिवसात रस्त्यांची कामे फवारणी व गुरांचा बंदोबस्त न झाल्यास मनसेच्या वतीने नगरपालिका विरोधात आंदोलनाचा इशारा…..!!

Copyright ©