यवतमाळ सामाजिक

जिल्हाधिकारी यांच्या भेटीनंतर जिल्ह्यातील तलाठी यांचे‌ आंदोलन मागे

कार्यकारी संपादक राजू चव्हाण

जिल्हाधिकारी यांच्या भेटीनंतर जिल्ह्यातील तलाठी यांचे‌ आंदोलन मागे
———————————————
घाटंजी- ई-पीक पाहणीच्या चुकीच्या अंमलबजावणी मुळे तलाठी अजय पस्तापुरे यांचा मृत्यूनंतर जिल्ह्यात दि. १५ सप्टेंबर २०२१ पासून विविध टप्प्यांत विदर्भ पटवारी संघ नागपूर जिल्हा शाखा यवतमाळ कडून आंदोलन पुकारण्यात आले होते.

जिल्ह्यातील तलाठी यांचे आनंदोलनाच्या प्रमुख मागण्या तलाठी पस्तापूरे यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा व संबंधित अधिकारी यांचेवर कारवाई व्हावी ही होती त्या आंदोलनात जिल्ह्यातील सर्व तलाठी सहभागी झाले होते त्याच बरोबर‌ विदर्भ मंडळ अधिकारी संघ यवतमाळ, यवतमाळ जिल्हा महसूल कर्मचारी संघटना व महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटना यवतमाळ यांनी तलाठी‌ यांनी पुकारलेल्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. जिल्ह्यातील सुरू असलेल्या तलाठी यांच्या आंदोलनाबाबत विदर्भ पटवारी संघाच्या पदाधिकारी यांचेशी दि. २८/९/२०२१ रोजी जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी सकारात्मक चर्चा केली त्या चर्चेनूसार पस्तापूरे परीवाराला शासनाकडून देय असनारी आर्थिक मदत, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी सोबतच संबधित अधिकारी यांचेवर चौकशीसाठी निर्देश देण्यात आले त्यानंतर पस्तापुरे परीवार यांचे न्याय मिळाल्याने झालेले समाधान लक्षात घेता व तलाठी हे ग्रामीण भागात काम करनारा महत्वाचा घटक असल्याने सद्याचा नैसर्गिक आपत्तीचा प्रश्न निर्माण झाल्याने विदर्भ पटवारी संघ नागपूर जिल्हा शाखा यवतमाळ कडून जिल्ह्यातील तलाठी आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर करण्यात आले. यावेळी विदर्भ पटवारी संघ नागपूर चे केंद्रीय अध्यक्ष बाळकृष्ण गाढवे,जिल्हा उपाध्यक्ष संजय मारकड, जिल्हा सचिव पवन बोंडे, सहसचिव विनोद अक्कलवार,कोषाध्यक्ष रूपेश थोडगे, यवतमाळ उपविभाग अध्यक्ष कृष्णकुमार दांडेकर, उपविभाग सचिव धिरज पत्रे,भरत पिसे इ. उपस्थित होते.

Copyright ©