यवतमाळ सामाजिक

घाटंजीत शेतकऱ्यांचा काळ्या कायद्या विरूद्ध निदर्शने करून भारत बंद ला पाठिंबा.

कार्यकारी संपादक राजू चव्हाण

घाटंजीत शेतकऱ्यांचा काळ्या कायद्या विरूद्ध निदर्शने करून भारत बंद ला पाठिंबा.

“”””””””””””””””””””””””””””””””””””””””             घाटंजी – भारतामध्ये संयुक्त किसान मोर्चाच्या भारत बंद च्या आवाहना वरून व शेतकरी विरोधातील तीन काळ्या कायद्याचा विरोध दर्शविण्यासाठी घाटंजी तालुक्यातील शेतकरी व पक्ष संघटनांच्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालया समोर निदर्शने करून मा. नरेंद्र मोदी पंतप्रधान यांना तहसीलदार घाटंजी मार्फत निवेदन देण्यात आले, या प्रसंगी विदर्भातील पावसाच्या कहराने शेतकऱ्यांचे कापूस आणि सोयाबीन उध्वस्त झाल्या मुळे सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी या करिता शेतकरी नेते मोरेश्वर वातीले, यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांना शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पुढील तिव्र स्वरुपाच्या आंदोलनाची घोषणा केली.या आंदोलनात प्राउटीस्टचे मधुकर निस्ताने, रा का.चे कैलास कोरवते, वंचित ब आघाडीचे संघपाल कांबळे, शिवसेनेचे मनोज ढगले, सुभाष गोडे, पांडुरंग निकोडे, मनोज राठोड, , मानिक मेश्राम, किशोर दावडा, अनंत चौधरी, नारायण भोयर, नरेंद्र धनरे, डॉ अरविंद तुरक, निलेश चव्हाण, विजय कोंडलवार, प्रशांत मस्के, डॉ विजय कडू, वसंतराव ढाले, , महादेव मादेशवार, जितेंद्र जुनघरे, सुधाकर पांगुळ, अरविंद जाधव, सुनील मुड, महेश ठाकरे, निखिल टिपले,राजु राठोड, जिवन राठोड, अरविंद जाधव, वामन राठोड, देविदास शिंदे, विनोद राठोड, महादेव गेडाम, गणेश राठोड,यांची प्रमुख उपस्थिती होती.

Copyright ©