यवतमाळ सामाजिक

कृषी विभाग व शास्त्रज्ञ यांची बांधावर क्षेत्रीय भेट

जिल्हा प्रतिनिधी

कृषी विभाग व शास्त्रज्ञ यांची बांधावर क्षेत्रीय भेट

मागील काही वर्षापासून शेतकऱ्यांना सतत अस्मानी संकटाला सामोरे जावे लागत आहे. परंतु अशाही परिस्थितीत बहुतांश शेतकरी आपला धीर न सोडता आपल्या मेहनतीवर विश्वास धरून शेतीची कामे करीत आहेत. याच अनुषंगाने मौजा चानी येथील शिवशंकर मधूकरराव ठोकळ यांच्या शेतात कृषी विभाग व शास्त्रज्ञ यांच्या संयुक्तिक चमूने भेट दिली. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नवनाथ कोळपकर यांनी शेतकऱ्यांचे मनोबल राखून ठेवण्यासाठी त्यांना सखोल मार्गदर्शन करण्याची व त्यांची परिस्थिती समजून घेणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. याप्रसंगी विभागीय कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रमोद यादगिरवार व डॉ. आशुतोष लाटकर हे देखील उपस्थित होते. श्री ठोकळ यांच्या शेतात भेट देऊन सद्यपरिस्थितीत कापूस,तूर, सोयाबीन या पिकांची काळजी कशी घ्यावी याबाबत मार्गदर्शन करून त्यावरील उपाययोजना सुचविल्या. नुकतीच श्री गुणवंत ठोकळ यांची महाराष्ट्र डीलर असोसिएशन उपाध्यक्ष पदी निवड झाल्यामुळे मा. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाप्रसंगी सुरेश ढेकळे, शिवसेना उपतालुका प्रमुख, यवतमाळ, श्री निलेश राऊत, माजी उपसरपंच, चिकणी, श्री अविनाश राऊत पोलीस पाटील, चिखली, कृषी सहाय्यक, पी एस बोईनवाड, कनिष्ठ लिपिक, सचिन कोरे याचप्रमाणे गावातील अक्षय ठोकळ, प्रकाश ठोकळ, शरद ठोकळ, सुधाकर भोयर व इतर शेतकरी उपस्थित होते.

Copyright ©