यवतमाळ सामाजिक

हीवरी प्राथमिक आरोग्य केंद्राला सुकाणू समिती व संसाधन गटाची भेट

जिल्हा प्रतिनिधी



येथिल भोंगळ कारभार आला चव्हाट्यावर
——————————————–

हिवरी प्रती- ग्रामीण भागातील जनतेला उत्तम आरोग्य सेवा मिळाव्यात या करिता कम्युनिटी अँक्शन फॉर हेल्थ हा प्रकल्प जिल्ह्यातील यवतमाळ व घाटंजी या दोन तालुक्यात राबविल्या जात आहेत. यात दोन्ही तालुक्यातील ५५ गावांचा समावेश आहे. याकरिता घाटंजी येथिल रसिकाश्रय संस्था जिल्हा नोडल संस्था म्हणून काम करीत आहे. यातूनच ग्रामीण भागातील जनतेला उत्तम आरोग्य सेवेची गरज कशी दूर होतील याकरिता यवतमाळ तालुक्यातील हिवरी प्राथमिक आरोग्य केंद्राला जिल्हा सुकाणू समिती व संसाधन गटाने भेट दिली.
ग्रामीण जनतेला उत्तम आरोग्य सेवा मिळावी, ते या आरोग्य चळवळीच्या प्रवाहात यावेत हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. या साठी रसिकाश्रय संस्था कार्य करीत आहे. त्यांच्या माध्यमातून प्राथमिक आरोग्य केंद्रातून दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवावर जनतेची देखरेख केली जाते. व यातून निघालेले मुद्दे हे जिल्हा स्तरावरील सुकाणू समिती व संसाधन गट (DMRG) द्वारे सोडविण्याकरिता प्रयत्न केला जात आहे. त्याच अनुषंगाने हिवरी आरोग्य केंद्रास भेट देण्यात आली. याकरिता जिल्हा सुकाणू समितीच्या सदस्या तथा जि. प. सदस्या रेनुताई शिंदे, रसिकाश्रय संस्थेचे समन्वयक नितिन पवार क्षेत्र पर्येवेक्षक सचिन साखरकर आणि पंचायत समिती सदस्य सुनीता मडावी होते. या महत्त्वाच्या भेटीत हिवरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार पहावयास मिळाला हे येथे विशेष येथिल प्रभार डॉ. नपते यांना देण्यात आले असल्याची माहिती मिळाली. मात्र डॉ. नपते यावेळी उपस्थित नव्हते. याबद्दल विचारले असता त्यांना हृदयाचा त्रास असल्याने ते यवतमाळ ला गेल्याचे कळते. मात्र त्यांनी रितसर कोणताही रजेचा अर्ज अथवा दौरा नोंद केलेले नव्हते. मात्र त्यावेळेला ओपीडी वर उपस्थित डॉ फुपरे यांना आपण येथे कसे असे समितीने विचारले असता आपण वरिष्ठांच्या तोंडी आदेशावरून ओपीडी वर हजर असल्याचे सांगितले. कारण वरिष्ठांची मर्जी जोपासली नाही तर आमच्या पगारावर परिणाम होतो त्यामुळे वरिष्ठांनी सांगितले ऐकावे लागते असेही फुफरे यांनी सांगितले. यावर वैद्यकिय अधिकारी यांनी त्यांच्या रजेबाबत तालुका आरोग्य अधिकारी यांना काही कल्पना दिली काय? याबाबत फोन वरून माहिती घेतली असता तालुका आरोग्य अधिकारी डॉ. खोडवे यांनी याबाबत काहीच माहिती नसल्याचे सांगून आपली जबाबदारी झटकून दिली. येथिल ढेपाळलेल्या आरोग्य सेवेचा पाढा गावातील पोलीस पाटील, उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य यांनी समितीपुढे वाचला. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अनेक तक्रारी मांडण्यात आल्या. या आरोग्य केंद्रात १४ कर्मचारी नोंद असताना केवळ चार ते पाच कर्मचारी कार्यरत असतात. येथिल वैद्यकीय अधिकारी कधीच मुख्यालयी राहत नसून रात्री दरम्यान केवळ एकच ए.न.म. ( परिचारिका ) कर्तव्य बजावताना दिसत असतात. बाकीना राजकीय आसरा असल्याने ते आरोग्य सेवेकडे दुर्लक्ष करतात विशेष म्हणजे एक एन ए एम रजेवर असल्याचे सांगण्यात आले परंतु रजेचा अर्जही आढळून आला नाहीं जसे डॉक्टर करतात तसेच इतर कर्मच्यार्याणाही अधिकारी मुभा देतात,तर यावर समितीने गंभीर रुग्ण, प्रसूतीच्या रुग्णाचे रात्री दरम्यानच्या सेवेबद्दल विचारले असता सर्वांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.सकाळी 9 पासून तर 5 वाजे पर्यंत कुणी ना कुणी असतात 5 नंतर हे रुग्णालय भुताचे महाल दिसून येत असल्याचे ग्रामपंचायत सदस्य सांगत होते,याची माहिती जिल्हधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा आरोग्य अधिकारी यांनाही या बाबत तक्रारी दाखल केल्या असल्याचे उपस्थित पदाधिकार्यांनी समितीस सांगितले, रात्री दरम्यान प्रसूती रुग्ण आला की केवळ नेहमी एकाच परिचारिकेची उपस्थित असते इथे राहणाऱ्या परीचारिकेला त्यांच्या सोबत असलेल्या आशा सेविकेची मदत घेवून प्रसूती करावी लागते हे विशेष एवढे असताना रुग्णाच्या नातेवाईकांचे सुध्दा बोलणे उपस्थित परीचारिकेला ऐकावे लागते. रात्री दरम्यान वैद्यकीय अधिकारी व परिचारिका उपस्थित राहणे गरजेचे आहे असे पवार यांनी बोलून दाखविले. या गावात शासनाने प्राथमिक आरोग्य केंद्र दिले मात्र याचा कोणताही फायदा होत नाही. येथिल भोंगळ कारभारामुळे रुग्णांना शहराच्या ठिकाणी न्यावे लागते. या आरोग्य केंद्राकडे वरिष्ठांचे दुर्लक्ष असल्याचे गावकऱ्यांनी खंत व्यक्त केली असून ही समिती या आरोग्य केंद्राला वठणीवर आणेल काय ही अपेक्षा गावकऱ्यांनी बाळगली आहे.

Copyright ©