यवतमाळ सामाजिक

खुली सामान्य ज्ञान स्पर्धा आणि प्रबोधनपर भाषण

जिल्हा प्रतिनिधी गोकुल खडसे

खुली सामान्य ज्ञान स्पर्धा आणि प्रबोधनपर भाषण 

यवतमाळ: – शहीद – ए – आझम भगतसिंग विचार मंच,यवतमाळ द्वारा आयोजित.
वीर भगतसिंग यांच्या जयंतीच्या निमित्ताने भगतसिंगांच्या एकंदर जीवनशैलीशी निगडित खुली सामान्य ज्ञान स्पर्धा.अगदी निशुल्क.
परीक्षेचा प्रकार – वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असून एकूण – ५० प्रश्न त्यात राहतील,माध्यम – ऑनलाइन/ऑफलाइन दोन्ही ही राहील.दिनांक – २८ सप्टेंबर, २०२१ ला सकाळी ठीक,१० वाजता कृषी ज्ञानदा बहुउद्देशीय शैक्षणिक संस्था द्वारा संचालित संपूर्ण रॅक परिवार यवतमाळ येथे परीक्षेचे आयोजन केले आहे.बक्षिसे – प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस स्वरूपात भेटवस्तू. परीक्षेत सहभाग नोंदवणाऱ्या विद्यार्थ्यांना भगतिसिंग यांच्या आयुष्यावर आधारित पुस्तक भेट.
तसेच विदर्भातील सुप्रसिद्ध वक्ते प्राध्यापक प्रवीण देशमुख सरांचे जाहिर व्याख्यान ही आयोजित केले आहे.तर व्याख्यानाचा विषय वीर भगतसिंग आणि आजचा युवा हा आहे.दिनांक – २८ सप्टेंबर,२०२१,ला दुपारी ठीक, ३ वाजून ५५ मिनिटांनी.हरहर कॉम्प्लेक्स च्या मागे
कृषी ज्ञानदा बहुउद्देशीय शैक्षणिक संस्था,द्वारा संचालित संपूर्ण रॅक परिवार,यवतमाळ येथे व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.अशी माहिती शहीद-ए-आझम भगतसिंग विचारमंच,यवतमाळ च्या सदस्यांनी दिली आहे.

Copyright ©